घरटेक-वेक'हे' कव्हर वाचवेल तुमच्या फोनला तुटण्यापासून

‘हे’ कव्हर वाचवेल तुमच्या फोनला तुटण्यापासून

Subscribe

आता तुमचा मोबाईल पडला तरी घाबरु नका. 'हे' खास डिव्हाईस मोबाईल पडल्यावरही त्याची स्क्रीन तुटण्यापासून वाचवेल.

प्रत्येकचजण आपल्या मोबाईलची काळजी घेत असतो. पाणी, धूळ यांपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कव्हर, स्क्रीनगार्ड्सचा वापर करतो. तरीही फोन पडण्याची आणि मोबाईलची स्क्रीन पडण्याची सतत भीती असते. मात्र, आता तुमची ही भीती कायमची दूर होणार आहे. इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने असं एक खास डिव्हाईस बनवलंय जे मोबाईल पडल्यावरही त्याची स्क्रीन तुटण्यापासून संरक्षण करेल. जर्मनीच्या आलेन युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या फिलिप फ्रेंजल या २५ वर्षीय तरुणाने, हे खास ‘एअर बॅग’ शैलीतलं डिव्हाईस तयार केलं आहे. या डिव्हाईसमुळे तुमचा मोबाईल पडल्यानंतरही सुरक्षित राहू शकतो, असा दावा या तरुणाने केला आहे.

‘अशाप्रकारे’ काम करेल हे डिव्हाईस…

हे खास डिव्हाईस तुम्ही एखाद्या कव्हरसारखे मोबाईलला घालू शकता. मोबाईल एखाद्या कठीण पृष्ठभागावर पडताच हे कव्हर एखाद्या एअर बॅगप्रमाणे आपोआप उघडेल आणि तुमच्या मोबाईलला पूर्णपणे कव्हर करुन टाकेल. या कव्हरमध्ये पॉवरफुल मेटल स्प्रिंग्ज फिट करण्यात आल्या आहेत. तसंच या कव्हरमध्ये काही सेन्सरही बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे मोबईल जमिनीवर पडण्याआधी काहीक्षण हे सेन्सॉर अॅक्टिव्ह होतील आणि कव्हरमधील स्प्रींग्ज बाहेर येऊन कव्हर तुमच्या मोबाईलला चारही बाजूंनी झाकून टाकेल. यामुळे सहाजिकच तुमच्या मोबाईलला कुठल्याहीप्रकारे हानी पोहचणार नाही. तसंच कव्हरच्या आत लपल्यामुळे मोबाईलची स्क्रीनही पूर्णत: सुरक्षित राहील.

- Advertisement -

पुन्हा-पुन्हा वापरु शकाल हे कव्हर

विशेष म्हणजे हे कव्हर तुम्ही एकदा वापरल्यावर पुन्हा त्याचा वापर करु शकता. मोबाईल कव्हरमधून स्प्रिंगद्वारे उघडलेली एअरबॅग तुम्ही पुन्हा PUSH करुन कव्हरमध्ये टाकू शकता. अशातऱ्हेने हे डिव्हाईस तुम्ही परत परत वापरु शकता.  फ्रेंजेल ने या डिव्हाईसला ‘AD केस’ असं नाव दिलं आहे. ज्यामध्ये AD चा अर्थ होतो- अॅक्टिव्ह डॅंपनिंग. सर्वात महत्वाची बाब म्हणजे फ्रेंजलच्या या डिव्हाईसला २०१८ सालचा ‘नॅशनल मॅकाट्रॉनिक्स अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे. तब्बल ४ वर्षांच्या अथक परिश्रमानंतक फ्रेंजेलने तयार केलेल्या या डिव्हाईसचं खऱ्या अर्थाने चीज झालं असं म्हणावं लागेल.

दरम्यान हे डिव्हाईस विक्रीसाठी नेमकं कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -