घरदेश-विदेशPoonch attack : दहशतवाद्यांना चीनमधून मिळाल्या स्टीलच्या गोळ्या, बुलेटप्रूफ जॅकेट कूचकामी

Poonch attack : दहशतवाद्यांना चीनमधून मिळाल्या स्टीलच्या गोळ्या, बुलेटप्रूफ जॅकेट कूचकामी

Subscribe

नवी दिल्ली : पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात चीनचा (chaina) हात असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. आर्मर पियर्सिंग इन्सेंडियरी’ (API) म्हणजेच स्टीलच्या गोळ्या चीनमध्ये तयार करण्यात आल्या आणि त्या पाकिस्तानमध्ये (pakistani terrorist) असलेल्या दहशतवाद्यांपर्यत पोहचवण्यात आल्याचे सुरक्षा एजन्सीच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदची संलग्न शाखा असलेल्या पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) ने पुंछमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनावर 20 एप्रिलला हल्ला झाला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. या हल्ल्यात चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या स्टीलच्या गोळ्यांचा वापर केला असल्याचे सुरक्षा एजन्सीच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्याने सांगितले की, दहशतवादी वापरत असलेल्या स्टीलच्या गोळ्या म्हणजेच ‘आर्मर पियर्सिंग इन्सेंडियरी’ (एपीआय) चीनमध्ये तयार केल्या जात आहेत. त्यानंतर या गोळ्या पाकिस्तानमध्ये जातात आणि तिथून त्या काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांपर्यंत पोहचवल्या जातात.

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यावेळीही स्टीलच्या गोळ्याचा वापर
विशेष बाब म्हणजे 2017 मध्ये पुलवामाच्या लेथपोरा येथे CRPF कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी स्टीलच्या गोळ्याचा वापर केला होता. ‘लेव्हल-4’ बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये स्टीलच्या गोळ्यांचा सामना करण्याची क्षमता आहे. त्यामुळे स्टीलच्या गोळ्या मोठे आव्हान म्हणून सुरक्षा एजन्सींकडून पाहिले जात आहे. याशिवाय लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पवर 2017 मध्ये झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी या गोळ्यांचा वापर करून सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. बुलेटप्रूफ जॅकेट घातलेल्या अनेक जवानांना स्टीलच्या गोळ्यांनी जखमी केले होते.

स्टील गोल्यावर जगात बंदी
लष्कर किंवा इतर कोणत्याही दलात स्टीलच्या गोळ्याचा वापर बेकायदेशीर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अगदी ‘नाटो’नेही स्टील बुलेटवर बंदी घातली आहे. मात्र या गोळ्या चीन आणि पाकिस्तानमध्ये वापरल्या जातात. 7.62 मिमी स्टील कोअर गोळ्या चीनमध्ये तयार केल्या जातात. या गोळ्यांची रेंज 300 मीटरपर्यंत असली तरी दहशतवादी जवळच्या लढाईसाठी याचा वापर करतात. या गोळ्या AK-47 किंवा त्याच मालिकेतील इतर कोणत्याही रायफलमधून अवघ्या काही मीटर अंतरावरून गोळीबार करता येऊ शकतो.

- Advertisement -

‘लेव्हल-4’ बुलेटप्रूफ जॅकेटचा निवडक ऑपरेशनसाठी वापर
बहुतेक बुलेटप्रूफ वाहने, फ्रंट, जॅकेट आणि वेस्ट ‘लेव्हल 3’ श्रेणीपर्यंत असतात. त्यांच्यावर स्टीलच्या गोळ्या झाडल्या तर त्यात आत घुसतात आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडतात. सध्या देशात सर्वत्र ‘लेव्हल-4’ बुलेटप्रूफ जॅकेट उपलब्ध नाही. हे जॅकेट फक्त निवडक ऑपरेशन्समध्ये वापरले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -