घरक्रीडासाक्षात 'क्रिकेटचा देव' भेटला अन् चिमुरडा चाहता झाला थक्क; सचिनची 'ही' अनोखी...

साक्षात ‘क्रिकेटचा देव’ भेटला अन् चिमुरडा चाहता झाला थक्क; सचिनची ‘ही’ अनोखी भेट होतेय व्हायरल

Subscribe

देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा असते की, त्याला क्रिकेट देव भेटावा. क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. आपण पाहिले असेलच आयपीएलच्या मैदानात सचिन दिसला तरी, स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांकडून सचिन... सचिन... असा नारा दिला जातो. पण साक्षात हाच देव जर समोर आला तर, आनंद गगनात मावत नाही. असाच काहीसा प्रकार सावंतवाडीमध्ये घडला.

देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची इच्छा असते की, त्याला क्रिकेट देव भेटावा. क्रिकेटचा देव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर. आपण पाहिले असेलच आयपीएलच्या मैदानात सचिन दिसला तरी, स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांकडून सचिन… सचिन… असा नारा दिला जातो. पण साक्षात हाच देव जर समोर आला तर, आनंद गगनात मावत नाही. असाच काहीसा प्रकार सावंतवाडीमध्ये घडला. एका चिमुरड्याला सचिनला भेटायचं होत आणि त्याची ही इच्छा सचिनने पूर्ण केली. त्यावेळी त्या चिमुरड्याच्या चेहऱ्यावरील आनंद हा द्विगुणित झाला होता. (legend sachin tendulkar celebrate his birthday at bhogve beach Meet Boy)

भारतीय संघाचा माजी खेळाडू, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा अशा बऱ्याच नावांनी प्रसिद्ध असलेल्या सचिन तेडुलकर यांने सोमवारी (24 एप्रिल 2023) वयाचे अर्धशतक पूर्ण केले. खरंतर 50वा वाढदिवस असल्याने दोन दिवस अगोदरच सेलिब्रेशन सुरू होतं. पण आपला वाढदिवस सचिन याने कोकणातील भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या एका हॉटेलमध्ये साजरा केला. अगदी साधेपणाने वाढदिवस साजरा केल्यानंतर सचिन मुंबईच्या दिशेने निघाला. मात्र त्यावेळी परतत असताना सचिनने सावंतवाडीतील ओम अमोल टेंबकर या चिमुकल्याची भेट घेतली.

- Advertisement -

ओम अमोल टेंबकर याला सचिनला भेटायची इच्छा होती. त्याची हीच इच्छा सचिनने पूर्ण केली. तसेच, सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या सिझनच्या बॉलवर ऑटोग्राफ केली. घाई गडबडीत असताना सुद्धा सचिनने त्या चिमुकल्याची इच्छा पुर्ण केली. सचिन तेंडुलकर याने त्या चिमुकल्या चाहत्याला वेळ दिला व “गुड बॉय” म्हणून कौतुक केले.

मागील दोन दिवस वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे परिसरातील एका हॉटेलमध्ये राहत होता. वाढदिवसाच्या निमित्ताने सचिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी आला होता. समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलमध्ये राहण्यासोबत समुद्रकिनाऱ्यावर क्रिकेट खेळण्याचा आस्वाद लुटला होता. त्यानंतर आज (मंगळवारी) मोपा विमानतळावरून परतीच्या प्रवासाला निघाला. यावेळी त्याचा चाहता असलेल्या सावंतवाडीतील चिमुकल्या ओमने त्याची मोपा विमानतळ परिसरात भेट घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2023 : लखनऊ सुपर जायंट्सचा ‘हा’ वेगवान गोलंदाज IPL सोडून मायदेशी परतणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -