घरदेश-विदेशKarnataka Assembly polls : देशात असा कोणीही नसेल... प्रियंका गांधी यांचे पंतप्रधानांना...

Karnataka Assembly polls : देशात असा कोणीही नसेल… प्रियंका गांधी यांचे पंतप्रधानांना उत्तर

Subscribe

बंगळुरू : विधानसभा निवडणुकीमुळे कर्नाटकमधील (Karnataka Assembly polls) राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress General Secretary Priyanka Gandhi) यांची टी नरसिपूर येथे जाहीरसभा (public meeting) झाली. त्यात त्यांनी कर्नाटकातील भाजपा सरकारवर (BJP Government) भ्रष्टाचाराचा आरोप केला. भाजपाने या राज्यातून सुमारे 1.5 लाख कोटी रुपये लूटले आहेत, असा दावा त्यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांबद्दल केलेल्या वक्तव्याचा प्रियंका गांधी यांनी समाचार घेतला.

- Advertisement -

तुम्ही कोणतीही लाज न बाळगता राज्याचे 40 टक्के सरकारी कमिशन लुटले, ही अत्यंत खेदाची बाब आहे. या सरकारमध्ये सर्व प्रकारचे घोटाळे होत आहेत. भ्रष्टाचारामुळे एका ठेकेदाराने आत्महत्या केली, पोलीस भरतीत घोटाळे झाले, सर्व प्रकारचा भ्रष्टाचार झाला. कंत्राटदारांच्या संघटनेने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दिला. या पत्रांच्या आधारे घोटाळे उघडकीस आणण्याची मागणी करत प्रियांका म्हणाल्या, यामध्ये अनेक लोक भाजपाशी संबंधित असल्याने कोणतीही कारवाई झाली नाही. एका आमदाराच्या मुलाकडून 8 कोटींची रोकड मिळाली, त्यावर कारवाई करण्याऐवजी वडिलांनी परेड काढली. त्यांनी कुणालाही सोडले नाही, संधी मिळेल तिथे लुटले.

हेही वाचा – कर्नाटकात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल; देवेंद्र फडणवीसांना विश्वास

- Advertisement -

विरोधकांना माझी कबर खणायची आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्याला प्रियंका गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला. या देशात असा कोणीही नसेल जो आपल्या पंतप्रधानांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची इच्छा करत नसेल, असे सांगून त्या म्हणाल्या, मला तुम्हाला विचारायचे आहे की, हा निवडणुकीचा मुद्दा आहे का? ते वेगळेच मुद्दे उपस्थित करतात, पण ते तुमच्याबद्दल का बोलत नाहीत? ते महागाई, बेरोजगारी यावर का बोलत नाहीत? असे सवाल त्यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -