घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरुन चर्चा

पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरुन चर्चा

Subscribe

पंतप्रधान मोदींनी दुसर्‍या महायुद्धातील रशियाच्या विजयाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, तसंच रशियामधील घटनात्मक सुधारणांवर मतदानाची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल देखील पुतीन यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी दुसर्‍या महायुद्धातील विजयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच रशियामधील घटनात्मक सुधारणांवर मतदानाची यशस्वी पूर्तता केल्याबद्दल देखील त्यांचं अभिनंदन केलं. व्लादिमीर पुतीन २०३६ पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोन कॉलबद्दल आभार मानले आणि दोन्ही देशांमधील सर्व क्षेत्रांमधील सामरिक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती पुतीन यांनी द्विपक्षीय संबंध राखण्यासाठी सहमती दर्शवली.त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषद भारतात होईल. द्विपक्षीय शिखर परिषदेत पंतप्रधान पुतीन यांचे स्वागत करण्याची उत्सुकता पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. पुतीन यांनी पुन्हा सांगितलं की, रशिया भारताबरोबर सर्व क्षेत्रात विशेषाधिकारात्मक भागीदारी करण्यासाठी कटीबद्ध आहे.


हेही वाचा – भारत आता विद्युत क्षेत्रात चीनला धक्का देण्याच्या तयारीत

- Advertisement -

पूर्व लडाखमध्ये एलएसीबाबत चीनबरोबर तणाव सुरु असताना ही चर्चा झाली आहे. अलीकडेच भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाला भेट दिली. या भेटीदरम्यान रशियाने भारताला एस-४०० अँटी क्षेपणास्त्र यंत्रणेसारखी अनेक महत्त्वाची शस्त्रे लवकर पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं. भारत आणि रशिया दरम्यान २०१८ मध्ये ४० हजार कोटी रुपयांमध्ये अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम एस-४०० ची डील अंतिम करण्यात आली होती. भारत आपली पाच युनिट्स खरेदी करणार आहे. याशिवाय रशियाकडून ३१ लढाऊ विमानांची खरेदीही केली जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -