घरदेश-विदेशअराजतकेविषयी तरुणांच्या मनात राग

अराजतकेविषयी तरुणांच्या मनात राग

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

येणारे दशक हे युवकांचे आणि एकत्रित युवाशक्तीमुळे देशाच्या विकासाला आकार आणि गती देणारे दशक म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त करताना आजचा युवक अत्यंत बुद्धीमान आणि कुशल असून, काही तरी नवे करण्याची स्वप्न बाळगून आहे. आजच्या युवकांना स्वत:ची मते आहेत, तसेच त्यांना व्यवस्थेविषयी आदर असून, अराजकतेविषयी त्यांच्या मनात राग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘मन की बात’ या आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या कार्यक्रमाच्या 60व्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. ते म्हणाले की, येत्या दशकावर, 21 व्या शतकात जन्मलेल्या युवकांचा प्रभाव राहील. देशाच्या विकासात या युवकांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे सांगत नव्या पिढीकडून देशाला आणखी मोठ्या उंचीवर नेण्याची संपूर्ण देश वाट बघत आहे, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

देशाच्या व्यवस्थेचा, चांगलं काही घडवण्यासाठी वापर व्हावा, अशी युवकांची इच्छा आहे आणि त्यासाठी जाब विचारण्याचीही त्यांची तयारी आहे. अस्थिरता, जातीयवाद, लिंगभेद किंवा इतर कुठले भेदभाव, कुप्रशासन या सर्व गोष्टींविषयी या युवकाच्या मनात नाराजी आहे. ही नवी पिढी नव्या भारताच्या नव्या व्यवस्थेचे प्रतिक आहे. ही पिढी एक नवी शिस्त, नवे युग आणि नवा विचार आणू पाहते आहे, याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

येत्या जानेवारी महिन्यात 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जाईल. त्यादिवशी प्रत्येक युवकांना आपल्या जबाबदार्‍यांविषयी विचार करावा, असे मोदी म्हणाले. देशातल्या युवकांनी विवेकानंद स्मारकासारख्या पर्यटन स्थळांना भेट द्यावी, यातून देशाचा इतिहास आणि विचार समजून घेता येईल. त्यासोबत पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाच्या संदर्भात त्यांनी मन की बात मधून खगोलशास्त्राविषयी देखील चर्चा केली. भारताला खगोलशास्त्राची प्राचीन परंपरा आहे. आधुनिक काळातही खगोलशास्त्राचा हा वारसा पुढे नेण्यात आला आहे. युवकांनी खगोल विज्ञानाकडे गांभीर्याने बघावे, त्याचा अभ्यास करावा, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -