घरदेश-विदेशकॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर प्रियदर्शनीचा नवा व्हिडिओ होतोय व्हायरल, शेजाऱ्यांशी केले कडाक्याचे...

कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्यानंतर प्रियदर्शनीचा नवा व्हिडिओ होतोय व्हायरल, शेजाऱ्यांशी केले कडाक्याचे भांडण

Subscribe
काही दिवसांपासून लखनऊ मधील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला एका कॅब ड्रायव्हरला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. यानंतर लखनऊ पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच अनेक नागरिकांकडून महिलेला अटक करण्याची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील कृष्णानगर मध्ये शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली होती. कॅब ड्रायव्हरने अंगावर गाडी घातल्याचा आरोप महिलेनं केला व त्याला रस्त्यावरच प्रचंड मारहाण करण्यास सुरूवात केली.  यानंतर उपस्थित नागरिकांनी ही संपुर्ण घटना कॅमेरात कैद केली तसेच सध्या सोशल मीडियावर कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव सहादत असून लखनऊमधील प्रियदर्शनी या महिलने त्या कॅब ड्रायव्हरवर हात उगारल. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा प्रियदर्शनीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या शेजाऱ्यांशी भांडताना दिसत आहे. भांडण इतके वाढले की पोलिसांना बोलवण्यात आले आहे.
नेमकं काय झालं-
प्रियदर्शनीचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या शेजाऱ्यांना घराला काळा रंग का लावला असा सवाल करत भांडात आहे. तसेच तिने हा रंग त्वरीत बदलावा असा आदेश देण्यास सुरुवात केली. प्रियदर्शनीच्या मते काळा रंग इंटरनॅशनल ड्रोन्सला प्रभावित करतो यामुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच प्रियदर्शनी आणि शेजाऱ्यांमध्ये प्रचंड वादावादी होते.  शेजारील व्यक्ती प्रियदर्शनीला अमेरीकेचे पुर्व राष्ट्रपती बराक हुसैन ओबामा यांच्या मुलीची उपमा दिली, शेजारी म्हणाले बराक हुसैन तुझा बाप आहे का?, तसेच मारण्याची धमकी दिली. संबधीत प्रकरण कळताच पोलिस तेथे दाखल होतात तसेच परिस्थिती सुधारण्यासाठी दोघांना घरी जाण्याचा सल्ला देतात. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ खूप जुना आहे अशी माहिती समोर येत आहे.
Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -