घरताज्या घडामोडीपुरात अडकलेल्या गर्भवतीची महिलेची रिक्षातच महिला पोलिसांनी केली डिलिव्हरी

पुरात अडकलेल्या गर्भवतीची महिलेची रिक्षातच महिला पोलिसांनी केली डिलिव्हरी

Subscribe

महिला पोलीस अरुंधती राजावत आणि त्यांची सहकारी इतिश्री या दोघींनी देखील पुरपरिस्थिती मानवतेचे दर्शन घडवले.

मध्यप्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे मध्यप्रदेशमध्ये अनेक ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. मध्यप्रदेशमधील अनेक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मध्यप्रदेशच्या राजगडमध्ये आपत्तीजनक परिस्थितीत मानवतेचे रुप पहायला मिळाले. पाऊस आणि पुरात अडकलेल्या गर्भवती महिलेची महिला पोलीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिक्षामध्ये डिलिव्हरी केली. (pregnant woman was delivered by women police in the rickshaw ) पुरात अडकलेल्या गर्भवती महिलेसाठी एक महिलाच धावून आल्याने आई आणि बाळ दोघांचा जीव वाचला. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असून त्यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या महिला पोलीस आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

 

- Advertisement -

राजगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातली ओलांडली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. अशा परिस्थितीत मोरपान येथे राहणाऱ्या एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्याने तिला रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु करण्यात आली. एका रिक्षात बसून महिलेला रुग्णालयात घेऊन जात असताना अर्ध्या रस्त्यात पुराच्या पाण्यामुळे पुढे जाता आले नाही. महिला प्रसूती वेदेने ओरडन होती. मात्र पुराच्या पाण्यातून तिला नेणे शक्य नव्हते. त्यामुळे रिक्षा रस्त्यात परिजन पोलीस ठाण्याबाहेर थांबवण्यात आली. पुराचे पाणी काही वेळाने ओसरेल असे सर्वांना वाटले परंतु तोपर्यत महिलेच्या प्रसूती वेदना आणखी वाढत होत्या. गर्भवती महिलेची खबर महिला पोलीस अरुंधती राजावत यांनी मिळली. त्यांनी आपल्या सहकारी इतिश्री आणि जवळ राहणाऱ्या दोन नर्सच्या मदतीने गर्भवती महिलेची रिक्षातच डिलिव्हरी केली. डिलिव्हरी नंतर बाळ आणि आई दोघेही सुखरुप आहेत.

- Advertisement -

 

महिला पोलीस अरुंधती राजावत आणि त्यांची सहकारी इतिश्री

महिला पोलीस अरुंधती राजावत आणि त्यांची सहकारी इतिश्री या दोघींनी देखील पुरपरिस्थितीत मानवतेचे दर्शन घडवले. दोघींच्या प्रसंगावधानामुळे दोन जीव वाचले. सध्या या दोघींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.


हेही वाचा – Delta Variant: खतरनाक डेल्टा व्हेरियंटचा १३५ देशांमध्ये विस्फोट, जागतिक संसर्गाचा आकडा २० कोटी पार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -