घरक्रीडाTokyo Olympics 2020: भारतीय महिला हॉकी संघ कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत, ग्रेट...

Tokyo Olympics 2020: भारतीय महिला हॉकी संघ कांस्य पदकाच्या लढतीत पराभूत, ग्रेट ब्रिटनचा ४-३ नं विजय

Subscribe

भारताची ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय आव्हान जिवंत ठेवले होते.

भारतीय महिला संघ ब्रॉंझ पदकाच्या लढतीत पराभूत झाला आहे. इंग्लंडने भारताला ४-३ असे हरवलं आहे. पिछाडीवर पडून देखील भारतीय संघाने बलाढ्य इंग्लंडला चांगली लढत दिली होती. मात्र बचावातील चुका भारताला महागात पडल्या आहेत. राणी रामपालचा भारतीय संघ मोठ्या जिद्दीने या सामन्यात उतरला होता. पण इंग्लडचा संघ हा मागचा ऑलिम्पिक विजेता संघ होता. हे विसरुन चालणार नव्हते आणि तेच आजच्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत दिसले. आक्रम आणि बचाव या दोन्ही बाजूंवर ग शंग सरस होता. उलट भारतीय गोलरक्षक सविताचे कौतुक करायला हवे की तिने प्रतिस्पर्धी संघाची अनेक जोरदार आक्रमणे परतवून लावली, अन्यथा आता समोर जो निकाल आला आहे तो वेगळा म्हणजे इंग्लंडच्या मोठ्या विजयाचा असता.

भारताची ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय आव्हान जिवंत ठेवले होते. पण, इंग्लंडला गोल वर्तुळाच्या जवळ जाऊ देण्याच्या वारंवार चुका भारताला महागात पडल्या. भारतीय संघ या सामन्यात हरला तरी यंदा ऑलिपिंकमध्ये भारताची एकूणच कामगिरी ही वाखण्याजोगी होती. जगातील पहिल्या दहा संघात नसलेला हा संघ आज ऑलिपिंकमध्ये चौथ्या स्थानावर झेपावतो हेच भारताच्या कामगिरीत सुधारणा होत आहे, हे दिसणारे आहे.

- Advertisement -

पुरुष हॉकी संघाच्या कांस्य पदाकाच्या कामाईनंतर महिला हॉकी संघाकडून कांस्य पदाकाची अपेक्षा होती. महिला हाकी संघाच्या सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये इंग्लंड आणि भारतीय संघात आक्रमक खेळी दिसत होती. ब्रीटनने जोरदार खेळी करत पहिल्या ५ मिनिटांमध्येच पहिला गोल डागला आणि भारतीय संघाला आव्हान दिले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला १० मिनिटांपुर्वी पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतू गोल करण्यात अपयश आले मात्र ठिक साडे सहा मिनिटांपुर्वीच पुन्हा एक गोल डागत ब्रिटनने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

ब्रिटनचे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी भारतीय हॉकी संघाने दुसरा क्वार्टर संपण्यापुर्वी १ गोल डागला आणि २-१ असा स्कोर केला. गुरजीतने भारतीय संघाकडून पहिला गोल केला आहे. मात्र आव्हान संपुष्टात आणण्यासाठी पुन्हा भारताने आक्रमक खेळी करत गुरजीतने दुसरा गोल केला. गुरजीतच्या दुसऱ्या गोलमुळे ब्रिटनशी २-२ अशी बरोबरी केली होती. यानंत वंदना कटारियाने गोल डागत भारताकडून ब्रिटनला आव्हान दिले होते. भारत ३-२ अशा स्कोरसह खेळत होता. मात्र तीसरे क्वार्टर संपण्यापुर्वीच ब्रिटनने गोल डागत भारताचे आव्हान संपुष्टात आणले. तिसरे क्वार्टर संपण्याच्या १० मिनिटांपुर्वी पेनल्टी कॉर्नर भारतीय संघाने मिळवला परंतू तो अपयशी ठरला.

- Advertisement -

चौथ्या क्वार्टरमध्ये ब्रिटनने चौथा गोल करुन भारताला आव्हान दिले होते. मात्र भारताला ब्रिटनचे आव्हान पुर्ण करण्यात अपयश आले आहे. यामुळे ब्रिटनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४-३ ने विजय मिळवला आहे. मात्र भारतीय संघाने केलेल्या कामगिरीमुळे देशभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -