घरदेश-विदेशराहुल गांधींचा लग्नाला होकार; वडिलकीच्या नात्याने भर पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी...

राहुल गांधींचा लग्नाला होकार; वडिलकीच्या नात्याने भर पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी मांडला प्रस्ताव

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशभरातील 15 विरोधी पक्ष एकत्र आले होते. या बैठकीनंतर सर्व प्रमुख नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी भर पत्रकार परिषदेत वडिलकीच्या नात्याने काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधींसमोर (Rahul Gandhi) लग्नाचा प्रसाव मांडला आणि राहुल गांधी यांनी या प्रस्तावाला होकारार्थी उत्तर दिले आहे. त्यामुळे राहुल गांधी लवकरच लग्याच्या बेडीत अडकणार असे दिसते आहे. (Rahul Gandhi’s nod to marriage Lalu Yadav made the proposal in a press conference as a father)

हेही वाचा – विचारधारेची लढाई असून आम्ही सर्व एकत्र; राहुल गांधींचा भाजपा, आरएसएसवर हल्लाबोल

- Advertisement -

लालू यादव म्हणाले की, दाढी वाढवू नका, लग्न करा. आमच्या सर्वांचा सल्ला ऐकून लग्न केले नाही. लग्न केले पाहिजे होते. पण अजूनसुद्धा वेळ गेली नाही. लग्न करा म्हणजे आम्ही सर्व अतिथी बनून येऊ. लग्न करा आमचे म्हणणे ऐका.  तुमच्या लग्नाबद्दल आम्ही तुमच्या आईसोबत (सोनिया गांधी) बोलतो. तुम्ही माझी आज्ञा मानून लग्न करा, असे लालू यादव म्हणाले. यावर राहुल गांधी यांनी तुम्ही बोललात म्हणजे आता लग्न होईल, असे उत्तर दिले.

हेही वाचा – राहुल गांधींचा लग्नाला होकार; वडिलकीच्या नात्याने भर पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी मांडला प्रस्ताव

- Advertisement -

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण्यामध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठीकत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे, बिहारचे उपमुख्यमंत्री अखिलेश यादव, एनसी नेते ओमर अब्दुल्ला, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा उपस्थित होते.

हेही वाचा – Mamata Banerjee : आम्ही विरोधक नाही, आम्ही या देशातलेच आहोत; ममतांचा भाजपला टोला

बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेला नितीशकुमार, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, लालू यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन, डी. राजा, येचुरी, दीपंकर यांच्यासह इतर नेत्यांनी संबोधित करताना सांगितेल की, आम्ही सर्वजण एकत्र आहोत. आघाडीची पुढील बैठक 10 ते 12 जुलै दरम्यान शिमल्यात काँग्रेसतर्फे आयोजित केली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जागावाटप, महायुतीचा संयुक्त कार्यक्रम, संयुक्त आंदोलन आदी मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -