घरदेश-विदेशविचारधारेची लढाई असून आम्ही सर्व एकत्र; राहुल गांधींचा भाजपा, आरएसएसवर हल्लाबोल

विचारधारेची लढाई असून आम्ही सर्व एकत्र; राहुल गांधींचा भाजपा, आरएसएसवर हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशभरातील 15 विरोधी पक्ष एकत्र आले होते. या बैठकीनंतर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि आरएसएसवर हल्लाबोल केला आहे. (There is a battle of ideologies and we are all together; Rahul Gandhi’s rant on BJP, RSS)

राहुल गांधी म्हणाले की, तुम्हाला माहिती आहेच की भारताच्या लोकशाहीवर हल्ला होत आहे. भाजपा आणि आरएसएस फाऊंडेशन, इन्स्टिट्यूट आणि आवाजावर हल्ला करत आहेत, असे मी बैठकीत बोलून दाखवले आहे. ही विचारधारेची लढाई असून आम्ही सर्व एकत्र आहोत. आमच्या सर्वांमध्ये काही मतभेद असतील, पण आम्ही हा निर्णय घेतला आहे की, हा विचारधारेचा लढा असून आम्ही एकत्र उभे आहोत. आम्ही ठरवले आहे की आम्ही एकत्र काम करू आणि आमच्या समान विचारधारेचे रक्षण करू. विरोधी ऐक्याची ही प्रक्रिया आहे जी पुढे जाईल. खर्गे आणि नितेशकुमार यांनी सांगितले आहे की, काही दिवसांनी आणखी एक बैठक होईल. त्या बैठकीत आम्ही अधिक चर्चा करू. ही विरोधी पक्षाची प्रक्रिया आहे आणि ती भविष्यात खूप खोलवर पुढे जाणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींचा लग्नाला होकार; वडिलकीच्या नात्याने भर पत्रकार परिषदेत लालू यादव यांनी मांडला प्रस्ताव

या विरोधी पक्षांची बैठकीला उपस्थिती

पाटण्यात पार पडलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे, अखिलेश यादव, उमर अब्दुल्ला, डी. राजा उपस्थित होते. आघाडीची पुढील बैठक 10 ते 12 जुलै दरम्यान शिमल्यात काँग्रेसतर्फे आयोजित केली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जागावाटप, महायुतीचा संयुक्त कार्यक्रम, संयुक्त आंदोलन आदी मुद्द्यांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -