घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022 : येत्या ३ वर्षात ४०० नवीन वंदे भारत ट्रेन, शेतकऱ्यांसाठी...

Budget 2022 : येत्या ३ वर्षात ४०० नवीन वंदे भारत ट्रेन, शेतकऱ्यांसाठी रेल्वेची सप्लाय चैन

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडताना रेल्वे बजेटच्या निमित्ताने एकुण ४०० वंदे भारत ट्रेनची घोषणा केली. या सर्व वंदे भारत ट्रेन्स नव्या जनरेशनच्या असतील. तर ऊर्जा संवर्धनासोबतच प्रवाशांसाठी सुकर असा अनुभव देणारे तंत्रज्ञान या रेल्वेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल. येत्या तीन वर्षांमध्ये ४०० नवीन वंदे भारत ट्रेन्स देण्यात येतील असेही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले.

वंदे भारतसाठी ट्रेनच्या आधुनिकतेसोबतच विस्टाडोम कोचच्या विकासावरही भर देण्यात येणार आहे. गेल्या ७ वर्षांमध्ये भारतात २४ हजार किलोमीटरचे विद्युतीकरण झाले आहे. भारतीय रेल्वेच्या गतीसाठी १०० गतीशक्ति कार्गोचाही प्लान आहे. त्याअंतर्गत रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

देशात मल्टी मोडल कनेक्टिव्हिटीसाटी पीएम गति शक्ति योजनेचा मास्टर प्लानची सुरूवात झाली आहे. पीएम गति शक्ति मास्टर प्लान योजनेची सुरूवात झाली आहे. पीएम गति शक्ति मास्टरप्लान अंतर्गत आर्थिक परिवर्तन, मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक दक्षतेसाठी ७ इंजिनचा समावेश आहे.

छोटे शेतकरी आणि उद्योजकांसाठी कुशल लॉजिस्टिक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सप्लाय चैन विकसित करण्यासाठीही शेतकऱ्यांना मदत होणार आहे. एक स्टेशन, एक उत्पादन याअंतर्गत योजनाही सुरू करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -