घरअर्थजगतUnion Budget 2022- सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा, PM Awas योजनेतून मिळणार 80 लाख...

Union Budget 2022- सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा, PM Awas योजनेतून मिळणार 80 लाख घरं

Subscribe

पंतप्रधान गती शक्ती योजनातून पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. यातून रेल्वे, रस्ते, हवाई वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज कोरोना महारमारीदरम्यान त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडून उद्योग आणि इतर क्षेत्रांसह सर्वसामान्यांना मोठ्या आशा होत्या. सर्वसामान्यांसाठी सरकारने अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये पंतप्रधान आवास योजना आणि नल-जल योजनेसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात तरतूदी केल्या आहेत.

पीएम आवास योजनेंतर्गत 80 लाख घरे

१) पीएम आवास योजनेंतर्गत 80 लाख घरे बांधली जातील, असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. त्यांच्यासाठी 48,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना घरे देण्यासाठी सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली होती. यासाठी मार्च 2022 पर्यंत 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पीएम आवास योजना-ग्रामीणचा लाभ मार्च 2024 पर्यंत मिळणार आहे. या अंतर्गत सरकारकडून घर खरेदीवर सबसिडी दिली जाते. वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी अनुदानाची रक्कम वेगवेगळी असते. तसेच मध्यम वर्ग आणि शहरी भागातील लोकांना घर मिळण्यासाठी बिल्डर्सशी संवाद साधणार आहे. मध्यम वर्ग आणि शहरी भागातील लोकांना ही घर मिळण्यासाठी बिल्डर्सशी संवाद साधणार आहे.

- Advertisement -

परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जमीन आणि बांधकाम संबंधित सर्व मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत काम करेल.

नल-जल योजना

१) या अर्थसंकल्पात सर्व घरांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणाऱ्या नल-जल योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

महिला सक्षमीकरणासाठी घोषणा 

३) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषन 2.0 सारख्या योजनांची व्यापक सुधारणा केली आहे.

तेलाच्या किंमतीबाबत मोठा निर्णय 

१) तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यात तेलबिया निर्मितीला प्राधान्य देणार असल्याचे मोदी सरकारने घोषणा केली आहे.

२) संपूर्ण देशातील अत्यंत मागास असलेले जिल्हे आणि तेथील लोकांचे जीवनमान सुधारावे यासाठी खास योजना आखण्यात आल्या आहेत. यापूर्वी ज्या जिल्ह्यांना लाभ मिळाला त्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत चांगलं काम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु त्या जिल्ह्यात आणखी काही गावं विकासाव्यतिरिक्त राहिले आहेत त्या ठिकाणी काम केले जाईल. असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत.

पंतप्रधान गती शक्ती योजना

१) पंतप्रधान गती शक्ती योजनातून पायाभूत सुविधेसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. यातून रेल्वे, रस्ते, हवाई वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.


Union Budget 2022 : विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘वन क्लास वन टीव्ही चॅनल्स’ची घोषणा, अंगणवाड्यांना सक्षम बनवणार


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -