घरदेश-विदेश६७ वर्षीय शेतकऱ्याचा ‘पद्मश्री’ पुरस्काने सन्मान!

६७ वर्षीय शेतकऱ्याचा ‘पद्मश्री’ पुरस्काने सन्मान!

Subscribe

या शेतकऱ्यांनी जौविक प्रयोगातून पिकवलेल्या १५ किलो फ्लॉवरची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

देशातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेल्या ‘पद्म’ पुरस्कारांची प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्यांध्ये राजस्थानच्या दोन प्रगतशील शेतकऱ्यांतासुद्धा समावेश आहे. राजस्थानच्या सीकार जिल्ह्यात राहणारे जगदीश पारीक आणि हुकुमचंद पाटीदा या दोन शेतकऱ्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी जगदीश पारीक हे ६७ वर्षांचे असून, जैविक शेतीच्या प्रयोगांसाठी ते जगभरात लोकप्रिय आहेत. त्यांनी जैविक शेतीच्या प्रयोगातून थेट १५ किलो वजनी फ्लॉवरचे यशस्वीरित्या उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या भाजीला आयआयएम अहमदाबादने नामांकनही दिले होते. इतकंच नाही तर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही पारीक यांच्या या १५ किलो फ्लॉवरची नोंद करण्यात आली आहे. जैविक शेतीमधील पारीक यांच्या अशा भन्नाट प्रयोगांमुळे त्यांना देशभरातील अनेक कॉलेजेसमध्येही ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रयोगाचे राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा वेळोवेळी कौतुक केले आहे.

शिक्षणाअभावी शेतीत केले करिअर

पारीक १२ वी इयत्तेत शिकत असताना काही कौटुंबिक कारणांमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. परिस्थितीमुळे शिकण्याची जिद्द असूनही त्यांना शिकता आले नाही. मात्र, शेती करण्याचं दडपण न घेता त्यांनी याच क्षेत्रात करिअर करायचं आणि विविध प्रयोग करुन, शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श घालून द्यायचा, असा निर्णय घेतला. काहीतरी वेगळं करुन दाखवण्याची जिद्द असलेल्या पारीक यांनी जैविक शेतीकडे अधिक लक्ष दिले आणि त्यातच विविध उपक्रम करायला सुरुवात केली. त्यांचे हे उपक्रम यशस्वी झाल्यामुळे हळूहळू लोकप्रिय होत गेले. अशाच एका प्रयोगामधून त्यांनी चक्क १५ किलो वजनाच्या फ्लॉवरचे उत्पादन घेतले, ज्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली.

- Advertisement -

११२ जणांना ‘पद्म’ पुरस्कार

राजस्थानच्या या २ शेतकऱ्यांसोबतच वेगवेगळ्या श्रेत्रातील ९२ व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कला, समाज सेवा, सार्वजनिक श्रेत्र, विज्ञान, इंजिनियरिंग, व्यापार, उद्योग, आरोग्य, शेती, साहित्य, शिक्षण, खेळ अशा सर्व क्षेत्रांमधील एकूण ११२ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -