घरक्रीडाIND v NZ मालिकेच्या तिसऱ्या सामन्यातही भारत विजयी

IND v NZ मालिकेच्या तिसऱ्या सामन्यातही भारत विजयी

Subscribe

भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या् मालिकांमध्ये भारताने ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. अशा रितीने भारताने ही मालिका आपल्या खिशात टाकली आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सात विकेट्स राखून दणदणीत विचय मिळवला आहे. भारताने या मालिकेतील सलग तीसरा सामना जिंकला आहे. न्यूझीलंडने भारताला २४४ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात ४४ व्या षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका जिंकल्यावर टीम इंडियाने न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला आहे. भारताकडून रोहित शर्माने ६२ धावा, कर्णधार विराट कोहलीने ६० धावा, अंबाती रायुडूने नाबाद ४० आणि दिनेश कार्तिकने नाबाद ३८ धावा काढल्या. या सामन्यात मोहम्मद शमी मॅन ऑफ द मॅच ठरला. या पाच सामने असलेल्या या मालिकेत भारत ३-० वर खेळत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -