घरदेश-विदेशWrestlers Protest : बृजभूषण सिंहविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची कबुली

Wrestlers Protest : बृजभूषण सिंहविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची कबुली

Subscribe

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि कुस्तीपटूंमध्ये झालेल्या चर्चेत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर कुस्तीपटूंनी जंतरमंतरवर सुरू असलेले आंदोलन मागे घेतले आहे. मात्र  दुसऱ्याच दिवशी (गुरुवार 8 जून) या प्रकरणात खळबळजनक खुलासा समोर आला आहे. माध्यमांशी बोलताना ज्या अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती, तिच्या वडिलांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, सूडाच्या भावनेनं त्यांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली, पण त्यांना आता स्वतःची चूक सुधारायची आहे. आता सत्य बाहेर येण्याची गरज असल्याचेही मुलीच्या वडिलांनी सांगितले आहे. सरकारनं गेल्या वर्षी झालेल्या चाचणीत त्यांच्या मुलीच्या पराभवाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सत्य बोलण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुस्तीपटूंच्या वडीलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. बृजभूषण यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय त्यांच्या मुलीच्या नसून त्यांचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, “हा माझा निर्णय होता. मी बाप आहे आणि तिच्यावर रागावलो होतो. मी घडत असलेल्या घडामोडी तिला सांगितल्या, पण त्यानंतर माझ्या मुलीनं “बाबा, तुम्हीच पाहा”, असे तिने मला सांगितले. (Wrestlers Protest: False complaint of sexual harassment against Brijbhushan Singh; Confession of minor wrestler’s father)

- Advertisement -

प्रकरणी कधी सुरू झाले?
अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आणि त्यांच्या मुलीने बृजभूषण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, याची सुरुवात 2022 मध्ये लखनऊ येथे पार पडलेल्या आशियाई अंडर-17 चॅम्पियनशिपच्या चाचणीने झाली. या चाचणीच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर अल्पवयीन कुस्तीपटूला भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. त्यावेळी मुलीच्या वडिलांनी पंचानी दिलेल्या निर्णयासाठी बृजभूषण यांना जबाबदार धरले होते. ते म्हणाले की, “मी सूडाच्या भावनेनं भरून गेलो होतो, कारण माझ्या मुलीची एक वर्षाची मेहनत पंचाच्या चुकीच्या निर्णयाने व्यर्थ गेली. त्यामुळेच मी बदला घेण्याचं ठरवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केली
अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बृजभूषण सिंह म्हणाले की, त्यांच्या मनात  कोणत्याही व्यक्तीसाठी वाईट भावना नाही. माझ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी अल्वयीन मुलीची दिशाभूल केल्यामुळे तिच्या हातून एवढी मोठी चूक घडली आहे. माझ्या मनात तक्रारदार कुस्तीपटू किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कोणतीही वाईट भावना नाही. त्यामुळे अल्पवयीन कुटुंबावर कारवाई करण्याची माझी मागणी नाही. पण यातून मला बदनाम करण्याचा हा कट असल्याचे आता सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -