घरताज्या घडामोडीमध्य प्रदेशात भाजपला गळती, सिंधियांच्या निकटवर्ती नेत्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

मध्य प्रदेशात भाजपला गळती, सिंधियांच्या निकटवर्ती नेत्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी

Subscribe

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या निकटवर्ती नेत्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे शिवपुरी जिल्ह्याचे उपाध्यक्ष राकेश कुमार गुप्ता यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोमवारी भव्य मिरवणूक काढून दोन हजार समर्थकांसह त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. 2020 साली ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत जे आमदार सरकारमधून फुटून बाहेर पडले होते. त्यापैकी गुप्ता एक नेते होते. पक्षप्रवेशावेळी राकेश कुमार गुप्ता यांनी हात जोडून काँग्रेस कार्यकर्त्यांची माफी मागितली.

- Advertisement -

मी पुन्हा घरात परतलो आहे. काँग्रेसने मला नाव, सन्मान आणि नेतृत्व दिले. मी काँग्रेसमध्ये ४० वर्ष काम केले. माझे वडील स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते मृत्यू होईपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते राहिले. मी काँग्रेस परिवाराची माफी मागू इच्छितो, कारण मी मोठी चूक केली होती, असं राकेश गुप्ता म्हणाले.

माझे शरीर जरी भाजपामध्ये गेले असले तरी माझा आत्मा काँग्रेसमध्येच होता. भाजपाने जे आम्हाला सांगितले आणि तिथे गेल्यावर जे दिसले, त्यात खूप फरक होता. पण काँग्रेस पक्ष जे सांगतो, ते करतोच, असं गुप्ता म्हणाले. दरम्यान, गुप्ता यांच्या घरवापसीमुळे काँग्रेसला मात्र मोठा आनंद झाला आहे. यानिमित्ताने शिवपुरी जिल्ह्यातील व्यापारी समाजाचा पाठिंबा मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे अनेक भाजपाचे नेते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. पक्ष सोडून जाणाऱ्याबाबत भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -


हेही वाचा : पंतप्रधान मोदींना ‘तो’ प्रश्न विचारणारी महिला पत्रकार झाली ट्रोल, वाचा…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -