घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी, मायावतींसह 'या' नेत्यांनी दिल्या 'रक्षाबंधन' च्या शुभेच्छा!

पंतप्रधान मोदी, मायावतींसह ‘या’ नेत्यांनी दिल्या ‘रक्षाबंधन’ च्या शुभेच्छा!

Subscribe

बहिण-भावाच्या नात्याच्या पवित्र सण सर्वत्र साजरा केला जात आहे

आज रक्षाबंधन. बहिण-भावाच्या नात्याच्या पवित्र सण सर्वत्र साजरा केला जात आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी कोरोना संकटात संपूर्ण देश हा सण साजरा करत आहे. सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून लिहिले की, ‘रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा’. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर नेत्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही ट्विट करुन देशवासियांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी लिहिले की, “रक्षाबंधनाच्या सर्व देशवासियांनी शुभेच्छा! राखी हा प्रेमाचा आणि विश्वासाचा अखंड धागा आहे जो बहिणींना भावांशी जोडतो. आज आपण महिलांच्या सन्मान आणि संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा आपण संकल्प करूया. ‘

- Advertisement -

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही रक्षाबंधनच्या नागरिकांना शुभेच्छा… मायावतींनी आपल्या ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, रक्षाबंधनच्या देशवासियांना मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा, बहिणीने बांधलेल्या भावाच्या मनगटावर राखीच्या रूपाने हे नातं जोडलं आहे. समाजाचे कल्याण यात आहे की या उत्सवाच्या पवित्र भावनेखाली सर्व लोकांनी शुद्ध मनाने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशातील काही ठिकाणी लॉकडाऊन आहे, सार्वजनिक वाहनांना बंदी असल्याने अशा परिस्थितीत लोक हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करत आहेत. या पवित्र सणाच्या केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Raksha Bandhan Video Songs: बहिण-भावाच्या नात्यासाठी सदाबहार सुपरहिट गाणी!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -