घरदेश-विदेशCBSE दहावीचे निकाल पुढच्याच आठवड्यात?

CBSE दहावीचे निकाल पुढच्याच आठवड्यात?

Subscribe

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल आज लागणार नसून सोशल मीडियावर अफवा पसरत असून त्यावर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन सीबीएसई बोर्डाच्या पीआरओ रमा शर्मा यांनी दिले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून लवकरच सीबीएसईच्या दहावीच्या निकालाचीही अधिकृतपणे तारीख जाहीर होणार आहे. सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सीबीएसई बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी दिले आहे. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार अशी अफवा असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, असे सीबीएसीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अफवांवर विश्वास ठेवू नका

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाचा आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे अशी अफवा सोशल मीडियावर पसरली. मात्र, ही अफवा असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. साधारणत: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येतो. पण यावेली मात्र कोणत्याही प्रकारची सूचना सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आलेली नाही आहे. सोशल मीडियावर निकालासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या असून सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार नाही आहे. बोर्डाकडून निकालासंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यात येईल, अशी माहिती सीबीएसई बोर्डाच्या पीआरओ रमा शर्मा यांनी दिली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, असे सीबीएसीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अद्यापही निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.

असा पाहा निकाल

cbse.nic.in आणि cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जा

- Advertisement -

संकेतस्थाळावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा

बैठक क्रमांक टाका

निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल

निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -