घरदेश-विदेशअखेर अंबानींचं राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर, वाचा!

अखेर अंबानींचं राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर, वाचा!

Subscribe

इतक्या दिवसांपासून रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना रिलायन्सने अखेर उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राफेल करार यांच्या अनुषंगाने रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर टीका केली आहे. अनेक प्रचारसभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून त्यांनी अनिल अंबानींना मोदाींनी दिलेल्या कथित ३० हजार कोटींचा उल्लेख करत थेट अंबानींच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अखेर, इतक्या दिवसांपासून या प्रकरणावर मौन बाळगलेल्या अनिल अंबानींनी आपलं मौन सोडलं आहे. या प्रकरणात रिलायन्सकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकामध्ये रिलायन्स उद्योग समूहाने अनिल अंबानींवर राहुल गांधींनी केलेले आरोप थेट शब्दांमध्ये फेटाळून लावले आहेत.

‘राहुल गांधींची वक्तव्य विपर्यास करणारी’

रिलायन्सचे प्रवक्ते दलजीत सिंग यांनी हे पत्रक काढलं असून त्यात ते म्हणतात, ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने निलाखस खोटी, विपर्यास करणारी मोहीम सुरू ठेवली आहे. काल त्यांनी रिलायन्स समुहाचे अध्यक्ष श्री. अनिल अंबानी यांच्यावर पक्षपाती भांडवलदार, अप्रामाणिक उद्योगपती अशा शब्दांत टीका केली आहे.
आतापर्यंत गांधी यांनी केलेली सर्व विधाने आणि दावे निराधार आहेत. आपली विधाने, दावे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे शब्द आणि एकूणच मोहीम अपमानास्पद आणि मानहानीकारक आहेत’. अंबानींवरील सर्व आरोप खोडून काढत असल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. तसेच, ‘राहुल गांधींच्या अशाच वक्तव्यांमुळे त्यांना न्यायालयाची माफी मागावी लागली आहे’, असा टोमणा देखील या पत्रकात मारला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वडिलांवर टीका केल्यानंतर राहुल गांधींचं मोदींना प्रत्युत्तर

‘..मग युपीएनं आम्हाला कामं कशी दिली?’

दरम्यान, आरोप खोडून काढत असतानाच, रिलायन्सकडून राहुल गांधींना युपीए सरकारने रिलायन्सला दिलेल्या कामांचाही दाखला देण्यात आला आहे. ‘राहुल गांधींच्या पक्षाच्या युपीए सरकारच्या २००४ ते २०१४ या कार्यकाळात अनिल अंबानींच्या नेतृत्त्वाखालील रिलायन्स समूहाला १ लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त अशा प्रकल्पांचे काम मिळाले. मग त्यांनी आरोप केल्यानुसार पक्षपाती भांडवलदार आणि अप्रामाणिक उद्योगपतीला त्यांच्याच सरकारने १० वर्षे सहकार्य केले होते का? याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे’, असेही या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -