घरदेश-विदेशहताश झालेले रवी शास्त्री मुंबई लोकलमध्ये

हताश झालेले रवी शास्त्री मुंबई लोकलमध्ये

Subscribe

रवी शास्त्री मुंबई लोकलमध्ये हताश बसलेले असल्याचा फोटो सध्या ट्विटवर फिरत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री मुंबई लोकलमध्ये काय करत आहेत? असा सवाल सध्या नेटीझन्स विचारत आहेत. तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं ना? हाच प्रश्न आम्हाला देखील पडला. त्यामुळे आम्ही देखील याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रवी शास्त्रींच्या दारूचं बिल द्यायला बीबीसीआयनं नकार दिला म्हणून, विराट कोहलीला कॅप्टन म्हणून निवड न केल्यानं, बीसीसीआयनं प्रवास खर्च द्यायला नकार दिल्यानं, विराट कोहली अनुष्का शर्मा सोबत दिसल्यानं, रवी शास्त्रींना लोकलमध्ये खिडकीची जागा तर मिळाली. पण, एका स्त्रीनं त्यांना खिडकीच्या बाजूची सीट हवी अशी मागणी केली. त्यात मजा म्हणजे विराट कोहली रवी शास्त्रींना पिण्याचे निमंत्रण देण्यास विसरला. अशा एक ना अनेक कॅप्शनखाली रवी शास्त्रींचा हा फोटो व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल काय चेष्टा चालवली आहे? आम्ही देखील त्याचा शोध घेतला. त्यावेळी एक महत्त्वाची बाब ध्यानात आली की , विविध कॅप्शनखाली ट्विटरवर दिसणारा तो फोटो रवी शास्त्रींचा नाही. तर तो फोटो आहे, त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा. ते म्हणतात ना  जगात एक सारखी दिसणारी सात माणसं असतात त्यातील हा प्रकार असंच काहीसं म्हणावं लागेल. तुम्ही सचिन तेंडुलकरचा डमी पाहिला, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील डमी पाहिला. तसाच डमी आता रवी शास्त्रींचा देखील सापडला आहे. तोही मुंबई लोकलमध्ये. मग काय विचारता रवी शास्त्रींच्या चेहऱ्याशी मिळता – जुळता असणाऱ्या या चेहऱ्याचा फोटो काढून तो अनेक कॅप्शन देत ट्विटवर शेअर केला गेला. त्यानंतर ट्विटरवर चर्चा सुरू झाली ती रवी शास्त्री लोकलमध्ये करतात तरी काय?याची.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -