घरमुंबईठाण्यात वस्तू व सेवा कराविषयी अद्ययावत सेवा केंद्र सुरु

ठाण्यात वस्तू व सेवा कराविषयी अद्ययावत सेवा केंद्र सुरु

Subscribe

वस्तू व सेवा कराबाबत व्यापारी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि विविध ई सेवा उपलब्ध करून देण्यात मदत करण्यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालयाने ठाण्यात अद्ययावत सेवा केंद्र सुरु केले आहे.

वस्तू व सेवा कराबाबत व्यापारी, व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक यांना येणाऱ्या अडचणी दूर करणे आणि विविध ई सेवा उपलब्ध करून देण्यात मदत करण्यासाठी वस्तू व सेवा कर कार्यालयाने ठाण्यात अद्ययावत सेवा केंद्र सुरु केले आहे. हे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या हस्ते सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आले.

हे मान्यवर होते उपस्थित

यावेळी अप्पर राज्यकर आयुक्त सुमेरकुमार काले, उपायुक्त राज्य उत्पाद शुल्क आशुतोष नाथ, रायगड विभागाचे सहआयुक्त केनवडेकर आणि पालघर विभागाचे सहआयुक्त नाडगौडा, राज्य कर सहआयुक्त विकास कुलकर्णी, राज्यकर उपायुक्त रूपमती मनेरे, महाबोले, सहायक राज्यकर आयुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, गणेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

ईसेवा नोंदणीसाठी अर्ज 

वस्तू व सेवा कर अधिनियमानुसार करदात्यांकरिता ईसेवा उपलब्ध केल्या आहेत. ईसेवा नोंदणीसाठी अर्ज करणे, विवरणपत्र दाखल करणे, परताव्यासाठी अर्ज करणे अशा विविध सेवा आहेत. यात येणाऱ्या अडचणी या सेवा केंद्राद्वारे सोडविण्यात येतील, असे सुमेरकुमार काले यांनी सांगितले. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी वस्तू व सेवा कर हा महत्वाचा विभाग असून या कार्यालयास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. राज्य कर सहआयुक्त विकास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -