घरदेश-विदेशजीव देईन पण मागे हटणार नाही - ममता बॅनर्जी

जीव देईन पण मागे हटणार नाही – ममता बॅनर्जी

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या नाट्यावर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, आपण एकवेळ जीव देऊ पण मागे हटणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे. रविवारी रात्री सीबीआयने कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाक्याचे आदेश दिलाचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या विरोधात हल्लाबोल करत धरणे आंदोलनाला सुरुवात केले आहे. हे आंदोलन ८ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ४० सीबीआय अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्ताच्या घराभोवती वेढा घालणं चुकीचे असून ही बाब चूकीची असून याविरोधात आपण आंदोलन करत आहोत, असे ममता बॅनर्जी म्हटल्या आहेत. एकवेळ जीव देईल. मात्र, पोलिसांच्या बाबतीत मागे हटणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हटल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘आता जीव गमवेन पण मागे हटणार नाही. एकवेळ तुम्ही तृणमुल काँग्रेसच्या नेत्यांना हात लावला तर रस्त्यावर उतरणार नाही. मात्र, जी व्यक्ती पोलीस खात्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे, तिच्यावर आरोप करत असाल तर मी त्याविरोधात आंदोलन करेल’.

- Advertisement -

उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

दरम्यान, या घटनेप्रकरणी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शरदा चिटफंडप्रकरणी सीबीआयने ममता सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यावर सीबीआयने पुरावे सादर करावेत त्यानंतर उद्या यावर सुनावणी घेण्यात येईल असे सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयला सहकार्य करीत नाहीत, असे याचिकेत म्हटले आहे. घोटाळ्यातील सर्व पुरावे राजीव कुमार नष्ट करु पाहत आहे, असा आरोपदेखील याचिकेत केला गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -