घरमुंबईउद्धव ठाकरे मोदींना म्हणाले 'मांत्रिक'

उद्धव ठाकरे मोदींना म्हणाले ‘मांत्रिक’

Subscribe

जे मांत्रिक २०२५ पर्यंतचा अंगारे-धुपारे देऊन मंत्र देतात. त्यावर आता उपाय योजना करायची आहे, अशी टीका उध्दव ठाकरे यांनी मोदींवर केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युतीचे घोंगडे भिजत पडलेले असताना शिवसेनेकडून भाजपावर आणि मोदींवर टीका मात्र थांबताना दिसत नाही. आज तर चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता टीका केली. कुणी तरी मांत्रिक येतो आणि म्हणतो २०२२ साली तुम्हाला हे देतो, ते देतो असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली.

मांत्रिक अंगारे-धुपारे देऊन मंत्र देतात

डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘वास्तव कुपोषणाचं’ या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मला इकडेही मांत्रिकापासून तुम्हाला सोडवायचं आहे आणि तिकडेही. तसेच जे मांत्रिक २०२५ पर्यंतचा अंगारे-धुपारे देऊन मंत्र देतात. त्यावर आता उपाय योजना करायची आहे’, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. त्याचसोबत, ‘मांत्रिक हे दुर्गम भागात आहेत. ज्यांच्याकडे आजही आदिवासी पाड्यातली लोकं जातात’, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

म्हणून दीपक सावंत यांना मंत्रीपदावरून दूर केले

मी डॉ. दीपक सावंत यांना मंत्रीपदापासून दूर का केलं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, ‘पण त्यांनी आतापर्यंत दिलेलं प्रत्येक काम यशस्वी रित्या पूर्ण केलंय आणि मला ते माझ्याजवळच हवे आहेत. माझ्याकडे काही काम आहेत. जी मला दीपक सावंत यांच्याकडून पूर्ण करून घ्यायची आहेत’, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच याच्या पुढे जाऊन आपण सत्तेत येणार आहोत आणि मोठी कामे करणार आहोत. त्यामुळे मंत्रिपद असो किंवा नको आपण काम करा असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -