घरदेश-विदेश#RippedJeansRow: मोदी, गडकरींच्या हाफ पँटमधील फोटोवर प्रियंका गांधी म्हणाल्या 'अरे देवा'

#RippedJeansRow: मोदी, गडकरींच्या हाफ पँटमधील फोटोवर प्रियंका गांधी म्हणाल्या ‘अरे देवा’

Subscribe

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीर्थ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यावरून केलेल्या संतापजनक टिपण्णीने राजकारण तापले आहे. महिलांच्या फाटलेल्या जीन्सवरून महिल्यांच्या फाटलेल्या जीन्सवरुन महिलांच्या संस्कारावर टीका केली होती. रावत यांच्या वक्तव्याचा सोशल मीडियातूनही निषेध केला जात आहे. यावर अनेक शिवेसना, काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दात रावत यांच्या समाचार घेतला. या वादात आता काँग्रेस सचिव प्रियांका गांधी यांनीही उडी घेत भाजपासह आरएसएसला लक्ष केले. प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांचे जुने फोटो शेअर करत भाजपा आणि आरएसएसला टार्गेट केले.

प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोला ‘अरे देवा, यांचे गुडघे दिसत आहेत अशी कॅप्शन दिली आहे. तसेच #RippedJeansTwitter असा ट्विटर हॅशटॅगही जोडला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हाफ पँटमधील कोलाज केलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मोदी, भागवत आणि गडकरींनी आरएसएस स्वयंसेवकांचा पोशाख घातला आहे. हे फोटो तेव्हाचे आहेत जेव्हा आरएसएस स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते पांढरा शर्ट, खाकी रंगाची हाफ पँट परिधान करत होते. रावत यांनी महिलांच्या कपड्यावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा आधार घेत या नेत्यांचेही गुडघे दिसत होते. असा निशाला साधला.

- Advertisement -

देहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिल्यांच्या फाटलेल्या जीन्सवरुन महिलांच्या संस्कारावर टीका केली. आजकाल महिला फाटलेली जीन्स वापरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार? महिलांच्या गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स पाहून समाजात काय संदेश जाईल? मुलांवर कसले संस्कार होणार? हे सर्व पालकांच्या हाती असते. एका स्वयंसेवी संस्थेत कार्य करणारी महिला जर असे कपडे घातल असेल तर समाजात कशाप्रकारचे संस्कार होतील? अशी वादग्रस्त टीका तीरथ सिंह रावत यांनी केली आहे. यावर खासदार जया बच्चन, नात नवेली नंदा, राज्यसभा खासदार प्रियांका, चतुर्वेदी, अभिनेत्री गुल पनाग, दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालिवाल, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही रावत यांच्या वक्तव्यावर खरमरीत टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा- #RippedJeansTwitter: फाटलेली जीन्स चर्चेत, जाणून घ्या कारण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -