घरट्रेंडिंग#RippedJeansTwitter: फाटलेली जीन्स चर्चेत, जाणून घ्या कारण

#RippedJeansTwitter: फाटलेली जीन्स चर्चेत, जाणून घ्या कारण

Subscribe

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत महिलांच्या कपड्यांवरून केलेल्या टिपण्णीवरून चांगलेच चर्चेत आलेत. सोशल मीडियावरुन अनेक राजकीय महिलांपासून ते बॉलीवूडपर्यंत अनेकांनी टीका करण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महिलांच्या फाटलेल्या जीन्सवरुन केले वक्तव्य आता तीरथ रावत यांना चांगलेच भोवले आहे. सध्या ट्विटवरही तीरथ रावत यांच्या वक्तव्यमुळे नवे ट्रेंन्ड सुरु झाले आहेत. सोशल मिडियावर सध्या #RippedJeansTwitter हा ट्रेंन्ड चालवला जात आहे. या टेंन्ड्रमध्ये बॉलिवूड अभिनेत्री, खासदार जया बच्चन, नात नवेली नंदा, राज्यसभा खासदार प्रियांका, चतुर्वेदी, अभिनेत्री गुल पनाग, दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी सहभाग घेतला आहे. सोशल मिडियावर या महिलांनी रिप्ड जीन्स घातलेला फोटो सोशल मिडियावर शेअर करत मुख्यमंत्री रावत यांच्या विधानाची चांगलीच हजेरी घेतली आहे.राज्यसभेच्या खासदार जया बच्चन म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांना अशी वत्त्कव्य शोभत नाही. कपड्यांवरून तुम्ही संस्कार ठरवणार? ही विकृत मानसिकता असून महिला अत्याचारांना प्रोत्साहन मिळते अशी टीका त्यांनी केली आहे. नात नव्या नवेली नंदा हीनेही यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कपडे बदलण्यापूर्वी तुमची मानसिकता बदला असे नव्या म्हणाली.

यावर राज्यसभेच्या खासदार, शिवसेना नेत्या प्रियका चतुर्वेदी यांनी रावत यांच्या विधानाचा समाचार घेत लिहिले की, देशाची संस्कृती आणि संस्कार महिलांच्या आवडीचा विचार करणाऱ्या पुरुषांमुळे ठरत असते. त्यामुळे विचार बदला मुख्यमंत्री रावत जी, तेव्हाच देश बदलेल.

- Advertisement -

फेमिना मिस इंडिया विजेती सिमरन कौर मुंडीनेही या ट्रेंन्डमध्ये सहभाग घेतला आहे.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही रावत यांच्या वक्तव्यार खरमरीत टीका केली आहे.
सीएम साहेब तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही बेशरम व्यक्ती दिसता. राज्य चलाते हो और दिमाग फटे दिखते है असं म्हणत मोईत्रा यांनी रावत यांच्यावर निशाणा साधला आहे. अनके भाजपा खासदारांनीही रावत यांनी धारेवर धरले आहे. तर काँग्रेसच्या काही नेत्यांनीही रावत यांच्यावर टीके केली आहे.

देहराडूनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिल्यांच्या फाटलेल्या जीन्सवरुन महिलांच्या संस्कारावर टीका केली. आजकाल महिला फाटलेली जीन्स वापरतात, हे बरोबर आहे का? हे कसले संस्कार? महिलांच्या गुडघ्यावर फाटलेल्या जीन्स पाहून समाजात काय संदेश जाईल? मुलांवर कसले संस्कार होणार? हे सर्व पालकांच्या हाती असते. एका स्वयंसेवी संस्थेत कार्य करणारी महिला जर असे कपडे घातल असेल तर समाजात कशाप्रकारचे संस्कार होतील? अशी वादग्रस्त टीका तीरथ सिंह रावत यांनी केली आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -