घरदेश-विदेशरशियाने युक्रेनच्या सर्वात सुरक्षित ल्वीव शहरावर डागली पाच क्षेपणास्त्रे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रशियाने युक्रेनच्या सर्वात सुरक्षित ल्वीव शहरावर डागली पाच क्षेपणास्त्रे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध संपण्याची कोणताही आशा दिसत नाही, कारण रशिया सातत्याने युक्रेनच्या विविध शहरांवर हल्ले करत आहे. या हल्ल्यातील युक्रेनमधील अनेक महत्त्वाची शहरं, हॉस्पीटल, कार्यालये जमीनदोस्त झालीत. दरम्यान सोमवारी पहाटे रशियाने युक्रेनच्या ल्वीव  शहरात पाच क्षेपणास्त्रे डागली तर अनेक हल्ले देखील केले. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. ल्वीव आणि उर्वरित पश्चिम युक्रेनला इतर भागांपेक्षा रशियन आक्रमणाचा कमी परिणाम जाणवला. त्यामुळे रशियातील इतर शहरांच्या तुलनेने हे शहर आत्तापर्यंतचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान मानले जात होते. मात्र रशियाने आता या शहरावर देखील हल्ले चढवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मारियुपोलमध्ये “शेवटपर्यंत लढा” देण्याची शपथ घेतली आहे. यामुळे रशियन सैन्याने बंदर शहरातील एक मोठा स्टील प्लांट उद्धवस्त केला, जो दक्षिण युक्रेनियन शहर मारियुपोलमध्ये प्रतिकार करण्याचे शेवटचे ठिकाण होते.

- Advertisement -

ल्वीवचे महापौर आंद्रे सडोवी यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितले की, ल्विव्ह शहरावर पाच क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. या हल्ल्यानंतर आपत्कालीन सेवेचे कर्मचारी घटनास्थळी हजर आहेत. लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल. तर युक्रेनचे पंतप्रधान डेनिस शिमगल यांनी रविवारी सांगितले की, हे युद्ध जिंकण्यासाठी आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढू. युक्रेन मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून युद्ध संपवण्यास तयार आहे, पण शरणागती पत्करण्याचा आमचा हेतू नाही.

युक्रेनचे उप संरक्षण मंत्री हन्ना मालयार यांनी मारियुपोलचे वर्णन “युक्रेनचे संरक्षण करणारी ढाल” असे केले. रशियाने मारियुपोलवर हल्ला करूनही युक्रेनचे सैन्य ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

देशाच्या विविध भागात क्षेपणास्त्रे आणि रॉकेट डागण्यात आले आहेत. दुसरीकडे, झेलेन्स्की यांनी रशियन सैनिकांवर त्यांच्या ताब्यातील भागात लोकांचा छळ आणि अपहरण केल्याचा आरोप केला आहे. झेलेन्स्की म्हणाले की, ते पूर्व युक्रेन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व काही करत आहे. समाजातील लोकांचे अपहरण केले जात आहे. मानवतावादी मदत वस्तू चोरीला गेल्या आहेत, ज्यामुळे दुष्काळ पडत आहे.

झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा जगाला रशियाविरुद्ध बँकिंग क्षेत्र आणि तेल उद्योग, इतर क्षेत्रांमध्ये निर्बंध वाढवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, युरोप आणि अमेरिकेतील प्रत्येकजण पाहू शकतो की, रशिया उघडपणे पाश्चात्य समाजाला अस्थिर करण्यासाठी ताकद वापरत आहे, याचा प्रतिकार करण्यासाठी पाश्चात्य देशांनी वेगाने नवीन आणि शक्तिशाली निर्बंध लादले पाहिजेत.


Mumbai Metro : मुंबई मेट्रोची वाहतूक हळूहळू रुळावर; मात्र उशिरा धावणाऱ्या मेट्रोमुळे प्रवाशांची गैरसोय

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -