घरताज्या घडामोडीसदावर्ते कुटुंबाच्या अडचणी संपेनात, जयश्री पाटील यांनी महिलेला मारलं, व्हिडीओ व्हायरल

सदावर्ते कुटुंबाच्या अडचणी संपेनात, जयश्री पाटील यांनी महिलेला मारलं, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांच्यामागे अडचणीचा ससेमिरा लागला आहे. आता सदावर्तेंची पत्नी जयश्री पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात त्या एका महिलेच्या अंगावर धावून गेल्याचे आणि तिच्यावर हात उचलताना दिसत आहे. तसेच एक महिला त्यांना तू तिला मारलयं असं ओरडून सांगत असल्याचं व्हिडीओत बघायला आणि ऐकायला येत आहे. तसेच या सर्व गोंगाटात एका लहान मुलीचा रडणेही ऐकू येत आहे. पण यामुळे जयश्री पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.

अॅडव्होकेट गुणरत्न सदारत्ने यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यापासून जयश्री पाटील फरार आहेत. जयश्री यांनी पोलीस संरक्षणही सोडले. तेव्हापासून पोलीस पाटील यांचा शोध घेत आहेत. त्या कुठे आणि कशा व कोणासोबत आहेत हे देखील पोलिसांना माहित नाही. पण आता त्यांचा महिलेला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याचीच शक्यता वाढली आहे. जयश्री पाटील यांना अटक होणार असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -