घरक्रीडा18 वर्षीय भारतीय युवा टेबल टेनिस खेळाडूचा अपघातात मृत्यू

18 वर्षीय भारतीय युवा टेबल टेनिस खेळाडूचा अपघातात मृत्यू

Subscribe

भारताचा युवा टेबल टेनिस खेळाडू विश्वा दीनदयाल याचं अपघातात निधन झालं आहे. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅप्मियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी विश्वा निघाला होता. त्यावेळी गुवाहाटीवरुन शिलांगकडे जात असताना त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला.

भारताचा युवा टेबल टेनिस खेळाडू विश्वा दीनदयाल याचं अपघातात निधन झालं आहे. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅप्मियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी विश्वा निघाला होता. त्यावेळी गुवाहाटीवरुन शिलांगकडे जात असताना त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात विश्वाचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत प्रवास करणारे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. रमेश संतोष कुमार, अविनाश प्रसन्नाजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार अशी या तिघांची नाव असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

18 वर्षीय युवा खेळाडू विश्वा दीनदयालच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या ऐन उमेदीच्या काळातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळं विश्वाच्या सर्व स्वप्न अधुरीच राहिली आहेत. विश्वा हा तामिळनाडूचा राहणारा असून, मेघालयमध्ये त्याच्या टॅक्सीचा अपघातात झाला. रविवार 17 एप्रिल रोजी हा अपघात झाल्याचं समजतं.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रि-भोई जिल्ह्यात विरुद्ध दिशेनं येणाऱ्या 12 चाकी ट्रकने चार खेळाडू प्रवास करत असलेल्या कारला धडक दिली. डिव्हायडर ओलांडत असताना ट्रक कारला धडकला. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या निवेदनानुसार, कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. या चारही खेळाडूंना नोंगपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत असताना दीनदयालनचा वाटेतच मृत्यू झाला.

इतरांची प्रकृती स्थिर

- Advertisement -

दीनदयालनचे सहकारी संतोष कुमार, अविनाश प्रसन्नजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार हे गंभीर जखमी झाले असले, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना शिलाँग येथील नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.


हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकी; केंद्र सरकारकडून सुरक्षेची व्यवस्था?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -