घरदेश-विदेशRussia & India : भारतीय मजुरांना रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरवले!

Russia & India : भारतीय मजुरांना रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरवले!

Subscribe

रशियामध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, काही भारतीय नागरिकांनी रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यांच्या सुटकेसाठी लवकरच भारतीय दूतावास संबंधित रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : हेलपर्सची नोकरी देऊन भारतीय मजुरांसोबत रशियामध्ये काहीसे विपरीत घडत असल्याचे चित्र आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, रशियाने भारतीय मजुरांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात उतरविले आहे. ही माहिती मिळताच परराष्ट्र मंत्रालयाने त्या मजुरांना सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहे. (Russia India Indian laborers deployed by Russia in war against Ukraine What exactly is the case read)

रशियामध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, काही भारतीय नागरिकांनी रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यांच्या सुटकेसाठी लवकरच भारतीय दूतावास संबंधित रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

नुकतीच माहिती समोर आली आहे की, रशियामध्ये काही भारतीयांना ‘हेलपर्स’ म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. आता त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध करण्यास भाग पाडले जात आहे. यातील बहुतांश लोक उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आहेत.

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि मॉस्कोमधील भारतीय दूतावासाला पत्र लिहून रशियात अडकलेल्या तीन भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. ओवैसी यांनी आपल्या पत्रात लिहिले होते की, गेल्या 25 दिवसांपासून तीन भारतीय नागरिकांशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Raj Thackeray : मनसेच्या इशाऱ्यानंतर निवडणूक आयोग नरमले; मुंबईतील शिक्षकांना कामातून वगळले

मजुरांच्या सुटकेसाठी रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला माहिती आहे की, काही भारतीय नागरिकांनी रशियन सैन्यात सहाय्यकांच्या नोकरीसाठी काँट्रॅक्ट केला आहे. भारतीय दूतावास त्या मजुरांना लवकर सुटका करण्याची विनंती करत असल्याची माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आम्ही या संदर्भात रशियन अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. आम्ही सर्व भारतीय नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि रशिया-युक्रेन युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन करतो.

हेही वाचा : Loksabha 2024: कैराना लोकसभेच्या जागेवर काँग्रेस-सपाकडून मुस्लीम कार्ड; काय आहेत राजकीय अर्थ

आतापर्यंत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू

नोव्हेंबर 2023 पासून रशिया-युक्रेन सीमेवर सुमारे 18 भारतीय नागरिक अडकले आहेत. हे लोक मार्युपोल, खार्किव, डोनेस्तक, रोस्तोव-ऑन-डॉन येथे अडकले आहेत. युद्धादरम्यान एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -