घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: पुतिनवर भडकले जो बायडेन; म्हणाले, 'खुनी हुकूमशहा' आणि 'सराईत...

Russia Ukraine War: पुतिनवर भडकले जो बायडेन; म्हणाले, ‘खुनी हुकूमशहा’ आणि ‘सराईत चोर’

Subscribe

युक्रेनवर हल्ला केल्यापासून अमेरिका रशियाला चारहीबाजूला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहे.

एकाबाजूला रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये वाद सुरू आहे. सतत रशिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एकमेकांवर हल्ला करत असतात. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले जो बायडेन?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आता व्लादिमीर पुतिन यांना ‘खुनी हुकूमशहा’ आणि ‘सराईत चोर’ असे म्हटले आहे. यापूर्वी बायडेन यांनी पुतिन यांना युद्ध गुन्हेगार म्हटले होते.

- Advertisement -

बायडेन यांनी पुतिन यांच्यावर नवीन टीका कॅपिटल हिलमधील सेंट पॅट्रिक दिनानिमित्ताने आयोजित एन्युअल फ्रेंड्स ऑफ आयरलँड लंच दरम्यान केली. या कार्यक्रमात संबोधित करताना जो बायडेन म्हणाले की, ‘पुतिन एक ‘खुनी हुकूमशहा’ आणि ‘सराईत चोर’ आहे, जो युक्रेनमधील लोकांविरोधात अनैतिक युद्ध करत आहे.’

काही दिवसांपूर्वी बायडेन पुतिन यांना म्हणाले होते की, पुतिन क्रूर आहे आणि त्यांचे लष्कर युक्रेनमध्ये जे काही करत आहे, ते अमानवीय आहे. त्यानंतर बायडेन यांनी पुतिन यांना युद्ध गुन्हेगार म्हटले होते. मग रशियाने बायडेन यांचे हे वक्तव्य फेटाळून लावले.

- Advertisement -

दरम्यान युक्रेनवर हल्ला केल्यापासून अमेरिका रशियाला चारहीबाजूला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. याशिवाय अमेरिकाने रशियाकडून होणारे कच्चे तेल आणि इतर वस्तूंचा पुरवठा रोखला आहे. रशियाला स्विफ्ट सिस्टममधून बाहेर केले आहे.


हेही वाचा – Russia Ukraine War : खारकीवजवळ रशियाच्या हवाई हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाला हरताळ


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -