घरताज्या घडामोडीRussia Ukraine War: युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Russia Ukraine War: युक्रेनमधील बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Subscribe

रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस चिघळत आहे. रशियाकडून बॉम्ब हल्ल्याचे सत्र सुरुच आहेत. या बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली आहे. आज सकाळपासून रशियाकडून युक्रेनमधील सर्व मोठ्या शहरांमध्ये हल्ले होत आहेत. दरम्यान खारकिवमध्ये झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दरम्यान अरिंदम बागची म्हणाले की, ‘खारकिवमध्ये जे हवाई हल्ले होत आहेत, त्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या मंत्रालय विद्यार्थ्याच्या कुटुंबियांसोबत संपर्कात आहे. आमच्या संवेदना कुटुंबियांसोबत आहेत.’

तसेच अरिंदम बागची पुढे म्हणाले की, ‘भारतीय परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेन राजदूतांच्या संपर्कात आहेत. याद्वारे अशी मागणी केली जात आहे की, भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित रस्ता द्या, कारण अनेक विद्यार्थी अजूनही खारकिव आणि इतर शहरांमध्ये अडकले आहे.’

- Advertisement -

या हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा असे नाव आहे. हा विद्यार्थी २१ वर्षाचा होता. कर्नाटकातील हावेरीच्या चालागेरीमध्ये राहणारा हा विद्यार्थी होता. नवीनचा मृत्यू रेस्क्यू दरम्यान झाला.

युक्रेनची राजधानी किवमधील बिघडलेल्या परिस्थितीदरम्यान आज भारतीय दूतावासाकडून ॲडवायझरी जारी केली होती. यामध्ये म्हटले होते की, ‘सर्व भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर किव सोडा. किव सोडण्यासाठी जे साहित्य त्यांना मिळाले आहेत, ते घेऊन बाहेर पडा. यामध्ये ट्रेन, बस इत्यादीतून प्रवास करण्याचा सल्ला दिला गेला होता.’

युक्रेनमध्ये जवळपास २० हजार भारतीय होते. ज्यामधील विद्यार्थी मेडिकलच्या शिक्षणासाठी गेले होते. यामधील चार हजारांहून अधिक जास्त विद्यार्थी आणि नागरिक भारतात परतले आहे. उर्वरित विद्यार्थी आणि भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


हेही वाचा – Russia Ukraine War: रशियाने युक्रेनमध्ये धोकादायक Vacuum Bombचा केला प्रयोग; जो शोषूण घेतो हवेतील ऑक्सिजन!


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -