घरदेश-विदेशVideo : 'गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार बनली नाही'

Video : ‘गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार बनली नाही’

Subscribe

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादग्रस्तव वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना ट्रोल केले आहे.

वादग्रस्त वक्तव्यातून चर्चेत राहणाऱ्या मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदारसंघाच्या खासदार साध्वी प्रिज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ‘गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार बनले नाही’, असे साध्वी म्हणाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. साध्वींच्या या वक्तव्यातून भाजप सरकार स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडवत आहे, अशी टीका साध्वींवर केली जात आहे.

- Advertisement -

नेमके काय म्हणाल्या साध्वी?

साध्वी सोहोर येथे एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. यावेळी जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. साध्वी म्हणाल्या की, ‘गटारे आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार म्हणून निवडूण आलेली नाही. माझे जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करेल.’ साध्वींच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय त्यांना ट्रोल देखील केले गेले आहे. याअगोदरही एटीएसचे दिवंगत चीफ हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन देशातील राजकारणात मोठे वादंग उठले होते.


हेही वाचा – … अन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उमा भारतींच्या गळ्यात पडून रडल्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -