घरदेश-विदेश... अन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उमा भारतींच्या गळ्यात पडून रडल्या

… अन साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर उमा भारतींच्या गळ्यात पडून रडल्या

Subscribe

प्रचारा दरम्यान केंद्रीय मंत्री उमा भारती आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची भेट झाली. या भेटी दरम्यान भावूक झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या.

भोपाळमध्ये दोन साध्वी एकत्र भेटल्या आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज उमा भारती यांची भेट घेतली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भोपाळ लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार आहेत. प्रचारा दरम्यान केंद्रीय मंत्री उमा भारती आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची भेट झाली. या भेटी दरम्यान भावूक झालेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या उमा भारती यांच्या गळ्यात पडून रडल्या. ऐवढेचच नाही तर उमा भारतींनी साध्वींच्या पाया पडल्या आणी साध्वी यांना आपल्या हाताने खाऊ घातले.

- Advertisement -

साधू-संन्यासी एकमेकांवर नाराज होत नाही

उमा भारती यांची भेट घेण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बऱ्याचवेळ चर्चा झाली. या भेटीनंतर उमा भारती यांनी साध्वींना चमच्याने भरवले. दरम्यान, उमा भारती यांनी सांगितले की, ‘मी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा खूप सन्मान करते. मी त्यांच्यावर झालेले अत्याचार पाहिले आहेत. त्यासाठी त्या खूप पूजनीय आहेत. मी त्यांच्यासाठी प्रचार करणार आहे. तर प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले की, साधू-संन्यासी कधीच एकमेकांवर नाराज होत नाहीत. मी उमा भारती यांना भेटायला आली आहे. आमच्या दोघांमध्ये नेहमी चांगले संबंध राहिले आहेत.’

साध्वी प्रज्ञा महान संत आहेत

दरम्यान, शनिवारी कटनी येथे उमा भारती यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, मध्यप्रदेशमध्ये तुमची जागा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी घेतली आहे का? तर यावर उमा भारती यांनी उत्तर दिले की, ‘साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर महान संत असून मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे. त्यांच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. त्यामुळे, माझी त्यांच्याबरोबर तुलना होऊच शकत नाही.’ दरम्यान, यावर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले होते की, मी उमा भारती यांना सांगू इच्छिते की, माझा ऐवढा सन्मान नका करु. तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आणि सन्माननिय आहे.

- Advertisement -

कोण आहे साध्वी ?

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पहिल्यांदा चर्चेत तेव्हा आल्या जेव्हा २००८ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. ९ वर्ष त्या तुरुंगात होत्या. सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत. उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची नाशिक जेलमध्ये जाऊन भेट घेतली होती. भोपाळमध्ये काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि दिग्विजय सिंह यांच्यामध्ये लढत होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -