घरदेश-विदेशअँकर मृत्यू प्रकरण: को-अँकर राहुल अवस्थीला अटक

अँकर मृत्यू प्रकरण: को-अँकर राहुल अवस्थीला अटक

Subscribe

राधिका या घरात तिच्या रुममेट्ससोबत राहत होती. या दोन्ही मुली कॉल सेंटरमध्ये काम करतात त्या दिवशी त्यांची नाईट शिफ्ट होती. त्यामुळे त्या दोघी घरी नव्हत्या. त्यामुळे संशयाची सुई ही थेट राहुलकडे जाते

झी न्यूजची अँकर राधिका कौशिक हिच्या मृत्यूप्रकरणी तिचा को अँकर राहुल अवस्थीला पोलिसांनी अटक केली आहे. राधिकाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत राहुल संशयास्पद आढळला. या हत्येसाठी जबाबदार असल्याच्या आरोपाखाली त्याला ही अटक करण्यात आली आहे. आज पोलीस राहुलला कोर्टासमोर सादर करणार आहे. या शिवाय पोलिसांनी शनिवारी पुन्हा एकदा क्राईम सीनचा तपास करुन एक रिपोर्ट तयार केला आहे तो देखील आता कोर्टात सादर करण्यात येणार आहे. या नंतरच या सगळ्या घटनेचा उलगडा होऊ शकणार आहे.

संपूर्ण घटना वाचा- चौथ्या मजल्यावरुन पडून ‘झी’ राजस्थानच्या न्यूज अँकरचा मृत्यू

 त्या रात्री काय झाले?

एसपी सिटी सुधा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार राधिका ही मूळची राजस्थानच्या मानसरोवरची आहे. दिल्लीतील सेक्टर ७७ मधील अंतरिक्ष फॉरेस्ट सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर भाड्याने राहत होती. गुरुवारी राधिका ऑफिसमधून उशीरा आली. तिला घरी यायला रात्री ११ वाजले. तिच्या मागोमाग तिच्या घरी राहुल अवस्थी आला. त्या रात्रीच राधिका चौथ्या मजल्यावरुन पडली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. शिवाय राहुल आणि राधिकामध्ये त्या रात्री भांडण झाले होते. भांडणानंतर राहुल टॉयलेटमध्ये निघून गेला. त्यानंतर त्याला राधिकाने उडी मारल्याचे त्याला समजले, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. पण राधिकाच्या पालकांनी राहुलवरच हत्येचा आरोप केला आहे.

- Advertisement -

 

रुम मेट्स नव्हत्या घरी

राधिका या घरात तिच्या रुममेट्ससोबत राहत होती. या दोन्ही मुली कॉल सेंटरमध्ये काम करतात त्या दिवशी त्यांची नाईट शिफ्ट होती. त्यामुळे त्या दोघी घरी नव्हत्या. त्यामुळे संशयाची सुई ही थेट राहुलकडे जाते, मुलीच्या मृत्यूला राहुलच जबाबदार असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे राहुलची कसून चौकशी करण्यात आली आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -