घरदेश-विदेशसलमानने दिली अरुणाचल प्रदेशला 'ही' भेट

सलमानने दिली अरुणाचल प्रदेशला ‘ही’ भेट

Subscribe

अभिनेता सलमान खान याने नुकतीच अरुणाचल प्रदेशला भेट दिली. यावेळी त्याच्यासोबत केंद्रीयमंत्री किरन रिजीजू आणि अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही सायकल चालवली. आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान सलमानने २२ लाख रूपयांचा निधी दान केला.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलामान खान आपल्या मुंबईतील घराजवळ सायकल चालवतांना दिसतो. मात्र आता सलमान अरुणाचल प्रदेशातील डोंगरांवरही सायकल चालवली. यावेळी त्याच्यासोबत केंद्रीयमंत्री किरन रिजीजू आणि अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनीही सायकल चालवली. अभिनेता सलमान खानला अरुणाचल प्रदेशचा ब्रॅन्ड अॅम्बेसेटर बनवण्यात आल्याची घोषणा येथो आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली. सलमानच्या भेटी दरम्यानचे फोटो रिजीजू यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून शेअर केले आहेत. या कार्यक्रमादरम्यान सलमानगही अरुणाचल प्रदेशाची पारंपारिक वेशभूषेत दिसला. त्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. सलमानने दिलेल्या भेटीनंतर रिजीजू यांनी सलमानचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

सलमानने अरुणाचल प्रदेशला दिली भेट 

सलमान गुरूवारी पंजाब येथून विमानाने आसामच्या डिब्रूगड विमानतळावर पोहोचला. याविमानतळावर केंद्रीयमंत्री किरन रिजीजू यांनी सलमानचे स्वागत केले. यानंतर सलमान आणि रिजीजू हे दोघे हेलिकॉप्टरने अरुणाचल येथे पोहोचले. एमटीबी अरुणाचल २०१८ या कार्यक्रमासाठी सलमान या ठिकाणी आला होता. सलमानने या कार्यक्रमामध्ये २२ लाख रुपयांचा निधी दान केला. या कार्यक्रमाला ८० सायकल चालकांनी भाग घेतला होता. सलमान सध्या आपला आगामी चित्रपट ‘भारत’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -