घरदेश-विदेशउद्धव ठाकरेंच्या जाण्याअगोदरच अयोध्येत तणावपूर्ण परिस्थिती

उद्धव ठाकरेंच्या जाण्याअगोदरच अयोध्येत तणावपूर्ण परिस्थिती

Subscribe

अयोध्येमध्ये हजारो शिवसैनिक दाखल झाले आहेत. परंतु, उद्धव ठाकरे पोहचण्याअगोदरच अयोध्येमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अयोध्येत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सध्या राममंदिराच्या मुद्यावर हिंदुतत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून अयोध्येत सभाचं आयोजन करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे शनिवारी आणि रविवारी अयोध्या दौऱ्यावर असणार आहेत. उद्या ते अयोध्येला पोहचणार आहेत. यासाठीच अयोध्येमध्ये हजारो शिवसैनिक दाखल झाले आहेत. परंतु, उद्धव ठाकरे पोहचण्याअगोदरच अयोध्येमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अयोध्येत मोठा पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चौकशीच्या फेर्‍यात

- Advertisement -

म्हणून आयोध्यात तणावपूर्ण परिस्थिती

अयोध्येत विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा देखील आयोजित करण्यात आली आहे. या सभेत दोन लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात हजारो शिवसैनिकांची गर्दी देखील सामिल झाली आहे. अयोध्येत अचानक झालेल्या या गर्दीमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील परिस्थिती बिघण्याची भीती तेथील काही स्थानिकांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा – अयोध्या वारीवर शिवसेनेत मतभेद नाहीत – उद्धव ठाकरे

- Advertisement -

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या अयोध्येत या पार्श्वभूमीवर कडक पोलस बंदोबस्त ठेवण्यात आला असाल तरी काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिकांकडून भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. या तणाव परिस्थितीत आपल्या जीवनाश्मक वस्तूंची कमतरता भासू नये म्हणून नागरिकांनी सर्व वस्तू घरीच आणून ठेवल्या आहेत. अयोध्येत तणावग्रस्त परिस्थितीत निर्माण झाल्यास काही दिवस घरातच बसावे लागेल या विचारांनी त्यांनी सर्व जीवनाश्मक वस्तू घरी आणून ठेवल्या आहेत.


हेही वाचा – उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील तेव्हा राम मंदिराचा प्रश्न विचारा – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -