Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Sanatan Dharma Row : उदयनिधी यांच्या श्रीमुखात मारण्यासाठी 10 लाखांचे बक्षीस!

Sanatan Dharma Row : उदयनिधी यांच्या श्रीमुखात मारण्यासाठी 10 लाखांचे बक्षीस!

Subscribe

विजयवाडा : द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजून उमटत आहेत. अयोध्येतील पुजारी परमहंस आचार्य यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. तर आता, आंध्र प्रदेशातील एका हिंदुत्ववादी संघटनेने स्टॅलिन यांच्या श्रीमुखात मारणाऱ्याला 10 लाख रुपये रोख देण्याचे जाहीर केले आहे.

- Advertisement -

उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच चेन्नईमध्ये एका सभेत सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना यासारख्या आजारांसोबत केली होती. त्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. एकीकडे भाजपसह देशभरातील अन्य हिंदुत्ववादी संघटना आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी दिल्लीपासून अनेक ठिकाणी त्यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा – Sanatan Dharma : मोदी अन् त्यांचे सहयोगी…; सनातन धर्माचा उल्लेख करत उदयनिधींचा हल्लाबोल

- Advertisement -

त्याचवेळी, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील जनजागरण समिती या हिंदू संघटनेने सनातन धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल उदयनिधी स्टॅलिन यांना थप्पड मारणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. संघटनेतर्फे विजयवाड्यात अनेक ठिकाणी याबाबत पोस्टरही लावले आहेत.

मी स्टॅलिनला शोधून मारेन
सनातन धर्माची सुरुवात आणि अंतही नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झालेला नाही. उदयनिधी स्टॅलिन यांचा शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीला मी 10 कोटी रुपयांचे बक्षीस देईन. तसेच, स्टॅलिन यांना मारण्याची कोणाची हिंमत नसेल तर, मी स्वत: स्टॅलिनला शोधून मारून टाकेन, असे अयोध्येतील तपस्वी छावणी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – माजी नगरसेवक सुधीर मोरेंच्या आत्महत्येचे कारण आले समोर, वकील महिलेवर गुन्हा दाखल

सनातन धर्माबद्दलच्या वक्तव्यावर उदयनिधी ठाम
उदयनिधी स्टॅलिन मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. भाजपाने आपल्या वक्तव्याची तोडमोड केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी एका कार्यक्रमात सनातन धर्मबद्दल बोललो. मी जे काही बोललो, ते पुन्हा पुन्हा सांगेन. मी फक्त हिंदू धर्मच नव्हे तर यात सर्व धर्मांचा समावेश केला आहे. मी जातीभेदांबद्दल बोललो. त्याचाही निषेध केला. पण मी केलेल्या वक्तव्य विरोधकांनी मोडतोड करून समोर आणले असल्याचा आरोप उदयनिधी यांनी केला आहे.

- Advertisment -