घरक्राइमSandeshkhali case : शाहजहानला सीबीआयला हवाली करण्यास नकार, हायकोर्टात अवमान याचिका

Sandeshkhali case : शाहजहानला सीबीआयला हवाली करण्यास नकार, हायकोर्टात अवमान याचिका

Subscribe

नवी दिल्ली : संदेशखळी येथे ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शाहजहान शेख याला सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने काल, मंगळवारी दिले आहेत. मात्र याच प्रकरणावरून पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार अडकल्याचे चित्र आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने ईडीला बंगाल सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

हेही वाचा – LokSabha Election 2024: खासदारांचा निधी थांबवून मोदींनी स्वत:साठी 7500 कोटींचं आलिशान विमान घेतलं

- Advertisement -

कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. शिवज्ञानम आणि न्यायमूर्ती हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणावर सुनावणी झाली होती. ईडी, राज्य सरकार आणि सीबीआयचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला आणि मंगळवारी जाहीर केला. राज्याला तातडीने सर्व कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

मात्र तरीही पश्चिम बंगाल पोलिसांनी शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयचे पथक मंगळवारी भवानी भवन येथील सीआयडी मुख्यालयात गेले होते. पण सुमारे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर ते तसेच परतले. पश्चिम बंगाल सरकारने उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याचे सांगत शाहजहान शेखचा ताबा सीबीआयकडे देण्यास बंगाल पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे ईडीच्या वतीने डेप्युटी सॉलिसिटर जनरल धीरज त्रिवेदी यांनी उच्च न्यायालयाकडे बंगाल सरकारच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्याची आणि त्यावर लवकरच सुनावणी घेण्याची परवानगी मागितली, जी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मंजूर केली.

हेही वाचा – Politics: नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणारच; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात चर्चांना उधाण

काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालमधील रेशन वितरणात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणी ईडीने सर्वप्रथम बंगालच्या माजी मंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक केली होती. त्यानंतर शाहजहान शेख आणि बनगाव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्य यांचाही सहभाग उघडकीस आला. यासंदर्भात ईडीचे पथक 5 जानेवारीला शहाजहान शेख याच्या निवासस्थानी छापा टाकण्यासाठी पोहोचले असता, हजारो लोकांनी तया पथकावर हल्ला केला होता. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 147 (दंगल), 148 (प्राणघातक शस्त्राद्वारे दंगल), 149 (बेकायदेशीर सभा), 307 (हत्येचा प्रयत्न), 333 (लोकसेवकाला गंभीर दुखापत करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांवर अत्याचार

तृणमूल काँग्रेसचे लोक घरात घुसतात. एखादी स्त्री सुंदर दिसली तर ते तिला सोबत घेऊन जातात. तिच्यावर अनेक दिवस बलात्कार होतो आणि नंतर तिला सोडून देतात, असा आरोप अनेक महिलांनी काही दिवसांपर्वीच केला होता. या अत्याचाराविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता. शेख शाहजहान हा मुख्य आरोपी असून त्याच्या अटकेची मागणीही या महिलांनी केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा – Gokhale Bridge : रेल्वेने सांगितले तसेच केले…, गोखले पुलाबाबत मुंबई महापालिकेने दिले कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -