घरदेश-विदेशSatya Pal Malik : सत्तेत असताना आत्मा का जागृत झाला नाही? अमित...

Satya Pal Malik : सत्तेत असताना आत्मा का जागृत झाला नाही? अमित शाहांचा पलटवार

Subscribe

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याबाबत (Pulwama attack) जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. आता त्यांना एका कथित विमा गैरव्यवहारप्रकरणी (alleged insurance scam) सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. मी सत्य बोलून काही लोकांचे पाप उघड केले आहे. कदाचित म्हणूनच मला बोलावणे आले असेल, अशी प्रतिक्रिया सत्यपाल मलिक यांनी दिली आहे. त्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पलटवार केला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या (CRPF) 40 जवानांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावरून जम्मू- काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारवर अलीकडेच निशाणा साधला. पुलवामा हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी एका मुलाखतीत केला होता. पुलवामामध्ये सीआरपीएफच्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना विमाने दिली नाहीत. सरकारने ही चूक केली आणि त्यामुळे 40 जवानांना वीरमरण आले, असे मलिक यांनी या म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्रीय अमित शाह यांनी आज, शनिवारी एका कार्यक्रमात त्यांच्या या दाव्याचा समाचार घेतला. भाजपापासून फारकत घेतल्यानंतरच त्यांना या सर्व गोष्टी का आठवल्या? सत्तेत असताना त्यांचा आत्मा का जागृत झाला नाही? असे सवाल अमित शाह यांनी केले आहेत. लपवालपवी करावी लागेल, असे भाजपाने काहीही केलेले नाही, असा दावाही त्यांनी केला.

सत्यपाल मलिक तुमच्या सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारे कोणी टीका केल्यास तपास यंत्रणा त्यांना का पाचारण करतात? असे विचारले असता, अमित शहा म्हणाले की, असे होत नाही. माझ्या माहितीनुसार त्यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. काही पुरावे किंवा माहिती मिळाली असेल, त्याअनुषंगाने त्यांना बोलावण्यात आले असेल. आमच्या विरोधात ते बोलले म्हणून त्यांना पाचरण केले, यात तथ्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

आमच्यापासून वेगळे झाल्यानंतरच त्यांना या सर्व गोष्टी का आठवतात? सत्तेत बसलेले असताना हा आत्मा का जागृत होत नाही? हे सर्व खरे असेल तर राज्यपालपदी असताना गप्प का होते? असे प्रश्न सत्यपाल मलिक यांना विचारले पाहिजेत. तसे पाहिले तर, जाहीरपणे चर्चा व्हावी, असे हे मुद्दे नाहीत. भाजपा सरकारने असे काहीही केले नाही जे लपवावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -