घरताज्या घडामोडी...म्हणून कर्नाटकात मुस्लिमांचे 4 टक्के आरक्षण रद्द केले; अमित शाहांनी दिलं स्पष्टीकरण

…म्हणून कर्नाटकात मुस्लिमांचे 4 टक्के आरक्षण रद्द केले; अमित शाहांनी दिलं स्पष्टीकरण

Subscribe

कर्नाटकात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी तयारीला सुरूवात केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

कर्नाटकात विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. 10 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी तयारीला सुरूवात केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ‘काँग्रेसने असंवैधानिक पद्धतीने मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले होते. मात्र, भाजपाने ही प्रथा संपवली’, असे शाह म्हणाले. (Four Percent Reservation For Muslims In Karnataka Cancelled Amit Shah Explained The Reason)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘भाजपाने पात्र व्यक्तींना आरक्षणाचा अधिकार दिला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून न्यायाचा विचार केला तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने (Congress) असंवैधानिकपणे 4 टक्के मुस्लिम आरक्षण दिले होते. हे असंवैधानिक आहे. कारण, आपली राज्यघटना धर्माच्या आधारावर आरक्षणाला परवानगी देत नाही. भाजपा सरकारने मुस्लिमांचे 4 टक्के आरक्षण (Muslim Reservation) रद्द केले आहे. सरकारने एससी, एसटी, वोक्कलिगा आणि लिंगायत यांच्या आरक्षणात वाढ केली आहे. आम्ही पात्र लोकांना अधिकार दिले आहेत”, असे अमित शाह म्हणाले.

- Advertisement -

कर्नाटकातील भाजप सरकारने गेल्या महिन्यात अल्पसंख्याकांचे चार टक्के आरक्षण रद्द केले होते. दोन प्रमुख समुदायांच्या विद्यमान कोट्यात हे समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार, OBC प्रवर्गाच्या 2B वर्गीकरणांतर्गत मुस्लिमांना देण्यात आलेले 4 टक्के आरक्षण आता दोन समान भागांमध्ये विभागले जाईल आणि वोक्कालिगस आणि लिंगायतांच्या विद्यमान कोट्यात जोडले जाईल.


हेही वाचा – अजित पवारांनी विचारधारा बदलली तर स्वागत; उदय सामंतांचे सूचक वक्यव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -