घरदेश-विदेशपवारांचा पास पहिल्या रांगेतलाच होता; शपथविधी सोहळ्यात अवमान झाला नाही

पवारांचा पास पहिल्या रांगेतलाच होता; शपथविधी सोहळ्यात अवमान झाला नाही

Subscribe

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाचव्या रांगेतील पास दिल्यामुळे पवारांनी या शपथविधीला पाठ फिरवली होती. या विषयावर शपथविधी सोहळ्याच्या दिवशी बराच वादही निर्माण झाला होता. मात्र आता राष्ट्रपती भवनाकडून याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पासवर V असे लिहिले होते. मात्र V म्हणजे पाचवी रांग नसून तो VVIP पास असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी ट्विट करत याबाबतचा खुलासा केला आहे. आम्ही शरद पवार यांना पहिल्या रांगेतील पास दिला होता. पहिली रांग ही VVIP पाहुण्यांसाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र पवार यांच्या कार्यालयातील कर्मचारी पासवरील V हे रोमन अक्षर पाहून गोंधळले असावेत. त्यांनी V चा अर्थ ५ असा घेतला असण्याची शक्यता अशोक मलिक यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

नरेंद्र मोदी आणि त्यांच्या ५७ मंत्र्यांनी ३० मे रोजी राष्ट्रपती भवन येथे शपथ घेतली होती.

- Advertisement -


हे वाचा – शरद पवारांची मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दांडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -