घरदेश-विदेशशरद पवारांची मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दांडी; हे आहे कारण

शरद पवारांची मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दांडी; हे आहे कारण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ५८ मंत्र्यांसहीत राष्ट्रपती भवन येथे पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. देशातील प्रमुख व्यक्ती, सनदी अधिकारी, अनेक राजकीय पक्षांचे नेते, सेलिब्रिटी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे अगदी पहिल्या रांगेत बसले होते. मात्र या सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अनुपस्थित राहिले. त्यांच्या अनुपस्थिती मागे मानापमानाचे कारण असल्याचे समजत आहे.

शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असूनही त्यांना पाचव्या रांगेतील पास देण्यात आला होता. पवार यांच्या कार्यालयाने संबंधित अधिकाऱ्यांना पवारांच्या ज्येष्ठतेनुसार पुढच्या रांगेतील पास द्यावा, अशी विनंती केली होती. त्यानंतरही शपथविधी सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पाचव्या रांगेतलाच दुसरा पास दिला. हा ज्येष्ठतेचा अपमान असल्यामुळे पवारांनी या शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहणे पसंत केले.

- Advertisement -

हे वाचा – राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या प्रकरणावर खेद व्यक्त केला आहे. “शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. शपथविधी सोहळ्यात त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहीजे होता. मात्र प्रोटोकॉल पाळला गेला नाही. आताच जर ही अवस्था आहे. तर यापुढे आणखी काय काय होणार? याचा विचार न केलेलाच बरा.” असे नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -