घरदेश-विदेशब्रिटिश महिलेवर बलात्कार करणाऱ्या भारतीयाला ७ वर्षाचा तुरुंगवास

ब्रिटिश महिलेवर बलात्कार करणाऱ्या भारतीयाला ७ वर्षाचा तुरुंगवास

Subscribe

अजय राणा सुरक्षित रित्या लिप्ट देईल असे महिलेला वाटले त्यामुळे ती त्याच्या गाडीत बसली. त्यानंतर अजय राणाने तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

ब्रिटनच्या एका महिलेवर बलात्कार करुन भारतात पळ काढणाऱ्या भारतीयाल ७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अजय राणा (३५ वर्ष) असे या आरोपी भारतीयाचे नाव आहे. अजय राणाने २०१७ मध्ये एका ब्रिटिश महिलेवर बलात्कार केला होता. आरोपीने गाडीतून लिफ्ट देतो असे सांगून महिलेला गाडीत बसवले. त्यानंतर तिला इंग्लंडच्या लोवस्टोफ्ट शहरामध्ये नेऊन गाडीतच तिच्यावर आरोपीने बलात्कार केला होता.


हेही वाचा – शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

- Advertisement -

बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीने २०१७ मध्ये भारतात पळ काढला. आजारी आईला भेटण्यासाठी जातो असे सांगून आरोपी अजय राणा १३ डिसेंबरला भारतात आला. २ आठवडे सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान आरोपीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा कोर्टाने दिली. इप्स्विच क्राउन कोर्टाने त्याला ७ वर्षाची शिक्षा सुनावली.


हेही वाचा – राजस्थानमध्ये विवाहितेवर गँगरेप; सोशल मीडियावर टाकला व्हिडिओ

- Advertisement -

सुनावणी दरम्यान हे समोर आले की, ३० वर्षाच्या महिलेला अजय राणा याने सांगितले की, बाहेर खूप थंडी आणि आणखी दोन लोकांना लिफ्ट दिली आहे. अजय राणा सुरक्षित रित्या लिप्ट देईल असे महिलेला वाटले त्यामुळे ती त्याच्या गाडीत बसली. त्यानंतर अजय राणाने तिला निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. कोर्टासमोर महिलेने सांगितले की, या घटनेमुळे माझे संपूर्ण आयुष्य भयभित झाले आहे. कोर्टाने इयरफोनवर मिळालेला डीएनए मॅच झाल्यानंतर आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -