घरदेश-विदेशशेअर बाजारमध्ये मोठी घसरण

शेअर बाजारमध्ये मोठी घसरण

Subscribe

मुंबई शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय २०१९ चा अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजार कोसळला आहे.

केंद्रीय २०१९ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारचा निर्देशांक (सेन्सेक्स) ६५५ अंकांनी घसरुन ३८,८४८.५४ वर आला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही २०५ अंकांची घसरण पहायला मिळाली आहे. शेअर बाजाराच्या ३० पैकी २५ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ५० पैकी ४४ शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावर झाला असल्याचे जाणकरांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पीएनबी बँकेत भूषण पाव अँड स्टील या कंपनीचा ३ हजार ८०० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. हा घोटाळा समोर आल्यामुळे पीएनबीच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. तर ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, एल अँड टी, मारुती आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

- Advertisement -

तेल कंपन्यांमध्ये मोठी घसरण

तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तेल कंपन्यांमधील हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कंपन्यांमध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा देखील परिणाम झाला आहे.


हेही वाचा – शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांना १ लाख कोटींचा चुना


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -