घरमुंबईनोबेल शांती पुरस्कार विजेत्या कैलाश सत्यार्थींना 'जीवनगौरव पुरस्कार'

नोबेल शांती पुरस्कार विजेत्या कैलाश सत्यार्थींना ‘जीवनगौरव पुरस्कार’

Subscribe

२०१४ साली भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मुलांच्या अधिकारासाठी केलेल्या कामाबद्दल सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार

रविवार, ७ जुलै रोजी कैलाश सत्यार्थी आणि त्यांच्या पत्नी सुमेधा कैलाश यांच्या सन्मानार्थ राष्ट्री. सिनेमा संग्रहालयात एक सोहळा आयोजित करण्यात आला होता. जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराने कैलाश सत्यार्थी यांना वोक्हार्ट समुहाच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील उपस्थितांच्या समोर त्यांच्या  ‘द प्राइस ऑफ फ्री’  या लघुपटाचे प्रदर्शनही करण्यात आले. २०१४ साली भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मुलांच्या अधिकारासाठी केलेल्या कामाबद्दल सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

”विविध अडचणी आणि हल्ल्यांनंतरही मुलांची सुटका करण्यासाठी त्यांच्या अधिकारासाठी आम्ही कधीही लढाई सोडली नाही कधीही समझोता केला नाही. हा लघुपट करूणा,आशा, साहस दर्शवतो  तसेच जबाबदारीने बालरोजगार मुक्त उत्पादनांसाठी आवाज बुलंद करतो. तसेच या लघुपटाच्या माध्यमातून मुलांसाठी असलेले कायदे आणि त्यांचे पालन करणा-या संस्थांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.” असे यावेळी बोलताना सत्यार्थी म्हणाले.

श्री सत्यार्थी आणि त्यांच्या पत्नी सुमेधा कैलाश यांचा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. सत्यार्थी आम्हा सगळ्यांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. आमचा समुह शिक्षण, पर्यावरण, आरोग्य आणि सेवाक्षेत्रात काम करतो. तसेच असहाय्य आणि गरजूंसाठी आम्ही अधिक काम करू असा आम्हाला विश्वास आहे.

– डॉ हबिल खोरकीवाला यांचे सुपूत्र डॉ हुजैफा खोराकीवाला (वोक्हार्ट)

- Advertisement -

ऑस्कर विजेता चित्रपट निर्माते डेविस गुगेनहेम यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित फ्री ऑफ द प्राईस या लघुपटाला २०१८ साली सॉल्ट लेक सिटी येथे झालेल्या सनडान्स चित्रपट महोत्सवात ज्युरी पुरस्कार मिळाला होता.  तर यावर्षी युट्युबवर झालेल्या मोंटे कार्लो चित्रपट महोत्सवात शांती पुरस्कार मिळाला.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -