घरदेश-विदेशनवज्योत यांच्या राजीनाम्यानंतर शत्रुघ्न सिन्हांनी केले कौतुक

नवज्योत यांच्या राजीनाम्यानंतर शत्रुघ्न सिन्हांनी केले कौतुक

Subscribe

नवज्योत सिंग यांच्या राजीनाम्याचा शत्रुघ्न सिन्हा यांना धक्का बसला आहे. परंतु, त्यांनी नवज्योत यांचे कौतुक केले आहे.

काँग्रेसचे नेते नवज्योग सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सिद्धूंचे कौतुक केले आहे. परंतु, सिद्धूंच्या राजीनाम्याबाबत आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. सिन्हा यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. नवज्योत हे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व असल्याचे सिन्हा म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले नवज्योत सिंग?

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ‘पंजाबच्या कॅबिनेट आणि मंत्रालायातून नवज्योत यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकूण मला आश्चर्य वाटलं. नवज्योत एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व आहे. ते एक लोकप्रिय खेळाडू आहेत. याशिवाय ते एक राजकीय तज्ज्ञ देखील आहेत. या सर्वांच्या पलिकडे जावून ते एक अद्भूत व्यक्तीमहत्व आहेत. याशिवाय ते माझे मित्र देखील आहेत.’

- Advertisement -

नवज्योत सिंग यांनी १० जुलैला दिला राजीनामा

रविवारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विटरवर आपण मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले होते. याशिवाय १० जुलैलाच आपण हा राजीनामा दिल्याचे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत मतभेद सुरु होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई पोलीस विभाग महापालिकेच्या डिफॉल्टर यादीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -