घरमुंबईबैल पकडण्यावरून पालिका-आयआयटी कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली

बैल पकडण्यावरून पालिका-आयआयटी कर्मचाऱ्यांमध्ये जुंपली

Subscribe

आयआयटी मुंबईच्या गेट क्रमांक ९ वर दोन दिवसांपूर्वी बैलांच्या झालेल्या झुंजीमध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने परिसरातील भटके गाय आणि बैल यांना पकडण्यास सुरुवात केली.

आयआयटी मुंबईच्या गेट क्रमांक ९ वर दोन दिवसांपूर्वी बैलांच्या झालेल्या झुंजीमध्ये एक विद्यार्थी जखमी झाला होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने आज, सोमवारी परिसरातील भटके गाय आणि बैल यांना पकडण्यास सुरुवात केली. मात्र गाय व बैल ही आयआयटीची मालकी असल्याचा दावा करत आयआयटीतील काही कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे पालिका आणि आयआयटी कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. अखेर पालिकेने पोलिसांना पाचारण करून सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी ६ ते ७ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

काय आहे पार्श्वभूमी

मुंबईत काही दिवसांपूर्वी दोन बैलांच्या भांडणात विद्यार्थ्याला उडवल्याची घटना समोर आली होती. पवई येथील आयआयटी येथे ही घटना घडली असून या घटनेमध्ये विद्यार्थी जखमी झाला होता. जखमी विद्यार्थ्याला विक्रोळी येथील शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्षय लथा असर, असे या विद्यार्थ्याचे नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृत्ती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. बैलाने ठोकर दिल्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

- Advertisement -

नेमके काय घडले?

पवई येथील आयआयटी गेट नंबर ९ समोर आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी गेटवर उभा असून तो आपल्या मोबईलमध्ये काहीतरी बघत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेअचानक त्यावेळी दोन बैल धावत येऊन त्या विद्यार्थ्याला धडकतात आणि या धडकेमध्ये विद्यार्थी खाली कोसळतोया दोन बैलांच्या मारामारीचा फटका या तरुणाला बसतोही धडक इतकी भीषण असते की या धडकेमध्ये हा तरुण काही कोसळतो आणि त्यात तो जखमी होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -