घरदेश-विदेशVideo: त्यांना ५० बायका तर १०५० मुलं होतात; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

Video: त्यांना ५० बायका तर १०५० मुलं होतात; भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान

Subscribe

उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सुरेंद्र सिंह यांनी मुस्लीस समुदायावर वक्तव्य केले असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील बैरिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सुरेंद्र सिंह यांनी मुस्लीस समुदायावर वक्तव्य केले असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुस्लिमांमध्ये ५० बायका केल्या जातात त्यांना १०५० मुलं होतात हे परंपरा नसून प्राण्यांची वृत्ती आहे, असे वादग्रस्त विधान भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.

- Advertisement -

वादग्रस्त व्यक्तिमत्त्व

यापूर्वीही आमदार सुरेंद्र सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. आणि त्यामुळे ते चर्चेतही राहिले आहेत. निवडणुकीच्या दरम्यान सुरेंद्र सिंह यांनी मायावती यांच्यावर टीका करताना पातळी सोडून शब्द प्रयोग केले होते. मायावती रोज फेशियल करतात. ६० वर्षाच्या असूनही त्या अजून तरुण आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले होते. तर २०१९ ची निवडणूक इस्लाम विरुद्ध भगवान अशी होणार आहे. विरोधी पक्ष राष्ट्रविरोधी आहेत. या निवडणुकीत भारताच्या नागरिकांनी निर्णय घ्यायचा आहे की इस्लाम जिंकणार की देव जिंकणार, असे वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले होते.

भाजपचे इतर नेते करतात बेताल वक्तव्य 

वादग्रस्त वक्तव्य करणारे सुरेंद्र सिंग हे काही पहिले भाजप नेते नाहीत. यापूर्वी भाजप खासदार साक्षी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी जास्त मुलांना जन्म द्यावे असे वक्तव्य केले होते. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी देखील रामजादों कि सरकार बनेगी या हरामजादों, की असे वक्तव्य केल्याने नवीन वादाला तोंड फुटले होते. शिवाय केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये जावे, असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला होता. या सर्वांच्या यादीत सुरेंद्र सिंग यांच्याही नावाचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -