घरदेश-विदेशसरकार शिवसेनेचेच येणार

सरकार शिवसेनेचेच येणार

Subscribe

संजय राऊत यांचा पुनरुच्चार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा झाली आहे. लवकरच आमचे सरकार येणार आहे, असा पुनरुच्चार शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट झाली. त्या भेटीनंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षाबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेविषयी अंतिम निर्णय होणार आहे. राज्यात १०० टक्के शिवसेनेचेच सरकार येईल. पुढच्या आठवड्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होणार आहे. जास्तीत जास्त गुरुवारपर्यंत सरकार स्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार आहे, असेही राऊत म्हणाले. तसेच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले होते.

- Advertisement -

सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीर बाबींमधून जावे लागते. तसेच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले होते. राष्ट्रपती शासनादरम्यान कोणीही सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास ते सरकार स्थापन करू शकतात. ज्या लोकांना वाटते राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन रहावे, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, असे लोक निरनिराळ्या बातम्या पेरत असतात, असे सांगत शिवसेनेत कोणताही संभ्रम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

संसदेत व्यक्त केली नाराजी
राज्यसभेतील आसनव्यवस्थेत बदल केल्यामुळे खासदार संजय राऊत नाराज झाले. त्यांनी सभापती वैंकय्या नायडू यांना पत्र लिहिले. शिवसेनेच्या भावना जाणुनबुजून हा निर्णय कोणाकडून तरी घेण्यात आला आहे. तसेच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा एनडीए विरोधात होती तेव्हाही माझी ज्येष्ठता पाहता राज्यसभेत तिसर्‍या रांगेतच स्थान देण्यात आले होते. पण आता माझा आणि पक्षाचा अपमान करण्यासाठी जाणुनबुजून पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -